तरुण भारत

बेळगावमधून दुबईला पोहचता येणार 7 तासांमध्ये

स्पाईस जेटची मुंबई येथून कनेक्टिव्हिटी : आठवडय़ातून एक दिवस मिळणार सेवा

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

दुबईला जाणारे उद्योजक तसेच प्रवाशांना आता बेळगावमधून अवघ्या 7 तासांमध्ये पोहचता येणार आहे. स्पाईस जेट कंपनीची मुंबई येथून कनेक्टिव्हिटी असून यामुळे बेळगावच्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी बेंगळूर किंवा गोवा येथून बेळगावच्या प्रवाशांना दुबईला पोहचावे लागत होते. परंतु या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून बेळगावमधून विमान प्रवासाची सोय होणार आहे.

स्पाईस जेटचे विमान रात्री 7.30 वा. बेळगावमधून निघून रात्री 9.25 वा. मुंबईला पोहचते. त्यानंतर 2 तास मुंबई विमानतळावर थांबावे लागणार आहे.  रात्री 11.30 वा. दुबईला विमान निघणार असून 1.10 वा. दुबईला पोहचणार आहे. हे विमान एकाच मार्गावर (वन वे) असणार असून केवळ आठवडय़ातील बुधवारी ही सेवा मिळणार आहे.

दुबईला जाण्यासाठीचा हा सर्वात उत्तम पर्याय बेळगावच्या प्रवाशांना असणार आहे. बेळगावमधील शेकडो व्यक्ती दुबई तसेच परिसरातील देशांमध्ये नोकरी- व्यवसायानिमित्त आहेत. अशा व्यक्तींना दुबईला पोहचण्यासाठी गोवा, बेंगळूर येथे अवलंबून न राहता बेळगावमधून प्रवास करता येणार आहे. यासाठी 8 हजार 500 रुपयांपासून तिकीट दर असणार आहे.

बेळगाव-दुबई थेट विमानसेवा मागणी रखडली

बेळगावमधून दुबईला विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. गोवा-बेळगाव-दुबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची मागणी बेळगावचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकांकडे केली होती. परंतु त्यांच्या अकाली निधनाने ही मागणी रखडली. त्यामुळे बेळगाव-दुबई थेट विमानसेवेसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 

Related Stories

जिल्हय़ात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

Omkar B

पावसातदेखील शनिवारच आठवडी बाजार बहरला

Patil_p

इटनाळमध्ये जावयाकडून सासऱयाचा खून

Patil_p

मनोहर बिर्जे; रंगभूषेचा किमयागार हरपला

Amit Kulkarni

अधिकाऱयांची कारवाई, खबऱयांची शिष्टाई!

Amit Kulkarni

निपाणी तालुक्याचा राज्यात कर्तृत्वाचा झेंडा

Patil_p
error: Content is protected !!