तरुण भारत

बदलत्या हवामानाने रब्बी हंगाम संकटात

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसांपासून शहरासह तालुक्मयातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. काही भागात झालेल्या किरकोळ अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामावर संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामात अतिपावसाचा फटका शेतकऱयांना बसला होता. त्यामुळे शेतकऱयांच्या आशा रब्बी हंगामावर होत्या. मात्र, आता बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.

Advertisements

तालुक्मयात रब्बी हंगामात शेतकऱयांनी मसूर, हरभरा, वाटाणे, ज्वारी आदी कडधान्यांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अधून-मधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रब्बी हंगामावर चिंतेचे सावट पसरले आहे. तालुक्मयातील उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी, कुदेमनी, कल्लेहोळ, बाची, तुरमुरी, सुळगा, बेकिनकेरे, अतिवाड, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी आदी भागात उन्हाळी बटाटा बियाणांबरोबर भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे लागवड केलेल्या बटाटा उगवणीवर परिणाम झाला असून ती लांबणीवर पडली आहे. वाढलेल्या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱयांना औषधांची फवारणी करावी लागणार आहे. पश्चिम भागात अधिक प्रमाणात उन्हाळी बटाटा लावगड केली जाते. मात्र, बदलत्या हवामानाचा फटका बटाटा उत्पादक शेतकऱयांना बसणार आहे. शिवाय भाजीपाल्याची लागवड सुरू आहे. मात्र वातावरण साथ देत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Related Stories

वीज कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

‘स्वीटकॉर्न’शेतकऱयांना ठरतेय फायदेशीर

Omkar B

कर्नाटकात गुरुवारी ६,७०६ नवीन रुग्ण

Abhijeet Shinde

शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ आज महिला आघाडीचा मेळावा

Amit Kulkarni

उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी सुसंस्कारीत विद्यार्थ्यांची गरज

Amit Kulkarni

नाटय़भूषण एणगी बाळाप्पा स्मारक ट्रस्टसाठी निवेदन

Patil_p
error: Content is protected !!