तरुण भारत

केपे गट काँग्रेस बैठकीत विविध विषयांवर चर्चा

वार्ताहर/ केपे

केपे गट काँग्रेस समितीची बैठक केपे येथे नुकतीच झाली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. केपेचे आमदार चंद्रकात कवळेकर हे अन्य 9 आमदारांसह काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यावर केपे मतदारसंघातील काँग्रेसचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झाले. मात्र काही कार्यकर्ते तसेच काँग्रेसमध्ये राहिले. काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांत ज्या पद्धतीने बार्से मतदारसंघात भाजप उमेदवाराला अपक्ष उमेदवाराने जोरदार झुंज दिली त्यामुळे केपे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.

Advertisements

तसेच ऍल्टन डिकॉस्ता यांची केपेमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. येणारी पालिका निवडणूक डोळय़ांसमोर ठेऊन केपे मतदारसंघात काँग्रेस पुन्हा एकदा जोर धरण्याच्या तयारीत असून त्यासंदर्भात केपे काँग्रेस गट समितीची ही बैठक झाली. यावेळी गिरीश चोडणकर, ऍल्टन डिकॉस्ता, माजी नगराध्यक्ष मानुएल कुलासो, राऊल पेरेरा, सुभाष फळदेसाई, सांजिल डिकॉस्ता, गोविंद देसाई, बातीस फर्नांडिस, तेरेझा त्रावासो, लॉरी त्रावासो व इतर हजर होते. यावेळी केपे मतदारसंघातील स्थिती, नगरपालिका निवडणुका व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

Related Stories

रेव्ह पार्टी आयोजनातील दोषींवर कारवाई करावी

Omkar B

मडगावातील ज्वेलर्संचा लाक्षणीक बंद

Amit Kulkarni

‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवासी रेल्वे गाडय़ा रद्द

Omkar B

युवतीचे अपहरण करून विनयभंग, मारहाणीचा प्रकार

Amit Kulkarni

जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद महत्त्वाचा

Amit Kulkarni

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 35

Omkar B
error: Content is protected !!