तरुण भारत

बेंगलोरचे खराब प्रदर्शन; आता ईस्ट बंगालकडून झाले पराभूत

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात ईस्ट बंगालने धक्कादायक विजयाची नोंद करताना गतविजेता बेंगलोर एफसीला एकमेव गोलने पराभूत केले. नवीन हंगामी प्रशिक्षक म्हणून संघाची धुरा सांभाळलेल्या नौशाद मुसाला पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले.

Advertisements

ईस्ट बंगालचा विजयी गोल सामन्याच्या 20व्या मिनिटाला मॅट्टी स्टिनमीनने नोंदविला. पहिल्या सत्रात घेतलेली आघाडी ईस्ट बंगालने दुसऱया सत्रातही कायम ठेवली आणि विजयाचे पूर्ण तीन गुण कमविले. बेंगलोर एफसीचा हा दहाव्या सामन्यांतील चौथा पराभव ठरला. त्यांचे आता तीन विजय आणि तीन बरोबरीने 12 गुण कायम राहिले. प्रशिक्षक रॉबी फाऊलर यांच्या अनुपस्थितीत खेणाऱया ईस्ट बंगालने आपला स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. त्यांचे आता दोन विजय आणि चार बरोबरीने 10 गुण झाले आहेत.

लढतीच्या पहिल्याच मिनिटाला बेंगलोर एफसीने धोकादायक चाल रचली. क्लिटॉन सिल्वाने दिलेल्या पासवर सुनील छेत्रीने मारलेला फटका सरळ ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदारच्या हातात गेला. त्यानंतर ईस्ट बंगालच्या राजू गायकवाडच्या थ्रो-ईनवर कप्तान डॅनियल फॉक्सचा गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला.

बेंगलोर एफसीच्या क्लिटॉन सिल्वाचा गोल करण्याचा यत्न गोलखांब्याच्या वरून गेल्यानंतर ईस्ट बंगालने लढतीच्या 20व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी घेतली. नारायण दासने उजव्या बगलेतून दिलेल्या पासवर मॅट्टी स्टिनमीनने गोलरक्षक गुरप्रीत सिंग धिल्लो याला चकविले आणि चेंडू जाळीत मारला. त्यापूर्वी ब्राईट एनोबाखारेच्या पासवर अंकीत मुखर्जीने हाणलेला फटका गुरप्रीतने अडविला होता.

बेंगलोर एफसीने पहिल्या सत्रात घिसाडघाईचा खेळ केला, यामुळे त्यांच्या अजितकुमार, दिमास देल्गादो आणि एरीक पार्तालू यांना पिवळी कार्डे दाखवून ताकीद देण्यात आली. पहिल्या सत्रातील अखेरीस बेंगलोरची गोल बाद करण्याची संधी गोलरक्षक मजुमदारमुळे वाया गेली. यावेळी पार्तालूने दिलेल्या पासवर छेत्रीचा गोल करण्याचा यत्न मजुमदारने फोल ठरविला. 

दुसऱया सत्रात आरंभापासूनच बेंगलोरने आक्रमक आणि वेगवान खेळ केला. सुनील छेत्रीचे दोन वेळा या दरम्यान गोल होण्याचे फटके देबजितने आपल्या उत्कृष्ट गोलरक्षणाने अडविले. राहुल भेकेच्या सावर दिमास देल्गादो आणि नंतर नामगयाल भुतियाच्या पासवर एरीक पार्तालूचे गोल करण्याचे यत्न वाया गेले. 78व्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या ब्राईटची आघाडी वाढविण्याची संधी गुरप्रीतने उधळून लावली.

Related Stories

जीव्हीएम सर्कलजवळ कचरा टाकणाऱय़ाविरोधात कारवाईचे संकेत-सरपंच राजेश नाईक

Amit Kulkarni

रविवारी पणजीत 7 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

पालिका दुरूस्ती अध्यादेश स्थगित

Patil_p

वाळपई-ठाणे येथे अपघातात हिवरे येथील युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

मडगावात 80 टक्के बाजारपेठ खुली

Omkar B

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण हाच पर्याय- मंत्री माविन गुदिन्हो

Amit Kulkarni
error: Content is protected !!