तरुण भारत

सातारा : नरेंद्र पाटील यांनी घेतली उदयनराजेंची भेट

सातारा / प्रतिनिधी :   

लोकसभेची 2019 ची निवडणुक सातारकरांना आठवते. मिशीला पिळ देत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदारकीचे उमेदवार उदयनराजेंच्या विरोधात उभे राहून ‘मी राजेंना पाडणार म्हणजे पाडणार’ असा जप केला होता. त्यामुळे त्यावेळी वातावरण चांगले तापले होते. आता तेच नरेंद्र पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार उदयनराजे यांना भेटण्यासाठी जलमंदिर येथे पोहचले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या या भेटीमुळे नरेंद्र पाटील हे सध्या सेनेत तर राजे भाजपामध्ये असल्याने नव्याने चर्चेला उत आला आहे.  

Advertisements

महायुतीच्या काळात सातारा लोकसभेचे उमेदवार म्हणून 2019 ला नरेंद्र पाटील यांच्या हाती कोल्हापूरात तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून भाजपाकडून शिवसेनेत पाठवले. नरेंद्र पाटील यांनी त्यावेळी प्रचारात एकच ठेका धरला होता तो म्हणजेच उदयनराजेंना पाडणार म्हणजे पाडणार. त्याकरता त्यांनी अक्षरशः जावली खोऱयापासून ते वाईपासून कराडपर्यंत भाग पिंजून काढला. उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजे यांच्यासोबत मिसळपाववर ताव मारला. परंतु राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कायमचा शत्रू नसतो. याचेच उदाहरण म्हणून शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उदयनराजे यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली. 

Related Stories

फलटण पूर्व भागात दारू भट्टयांचे साम्राज्य

datta jadhav

बावधनमध्ये अजुनही अटकसत्र सुरूच

Patil_p

परळी खोयात कोरोना पुन्हा सक्रिय होतोय

Patil_p

सातारा : शिवराज पेट्रोलपंप परिसरात अनोळखी मृतदेह आढळला

Abhijeet Shinde

सातारा : गेल्या 24 तासात एकूण सरासरी 5.61 मि.मी. पाऊस

Abhijeet Shinde

गुरुकुलच्या साईराजचा कांस्य पदकावर नेम

Patil_p
error: Content is protected !!