तरुण भारत

आर्थिक कारणावरुन पत्नी, मुलाकडून एकास चटके

इस्लामपूर / प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथील सयाजी मारुती पवार (४२) यांना पत्नी व मुलाने उलातणे तापवून चटके व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. दारुचे व्यसन व त्यातून बाहेरील आर्थिक देणी केल्याने हा प्रकार घडला आहे.

अश्विनी मारुती पवार व सत्यजित पवार अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सयाजी यांचा मुलगा सत्यजित याचे चार चाकी व दहा चाकी असे दोन ट्रक आहेत. त्यावर सयाजी हे चालक म्हणून काम करीत आहेत. दि. ३१ डिसेंबर रोजी सळई पोहोच करण्याचे भाडे होते. ती सळई ठराविक ठिकाणी पोहोच न करता, वाघवाडी व रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील भंगारवाला यांना विक्री केली. त्याचे पैसे लोकांचे देणी भागवण्यासाठी वापरले. व ट्रक रिलायन्स पेट्रोल पंप येथे लावला.त्यांनतर ते आष्टा परिसरात फिरत राहिले.

दि.७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सयाजी हे दारुच्या नशेत घरी आल्यानंतर पत्नी अश्विनी व मुलगा सत्यजित यांनी आगीवर उलातने तापवून शरीरावर चटके दिले. त्यांना लथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच घरात कोंडून घातले. दि.९रोजी पुन्हा सळई विक्रीचे पैसे मागून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करीत असताना सयाजी हा पळून गेला. एका मित्राकडे थांबून इस्लामपूर पोलीस ठाण्यात येवून पत्नी व मुला विरुद्ध फिर्याद दिली.

Advertisements

Related Stories

सांगली : विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू

Abhijeet Shinde

बुधगावमधील कुपनलिका दुरुस्त करण्याची मागणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मौजे आगर येथे युवकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

इचलकरंजीत कॅसिनो व जुगार अड्यावर छापा

Abhijeet Shinde

सांगली : विद्यापीठ उपकेंद्र हा राजकारणाचा विषय नाही

Abhijeet Shinde

सांगली मनपा स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांचा मुंबई येथे सत्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!