तरुण भारत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 17 रोजी बेळगावात

जनसेवक मेळाव्याच्या समारंभाला राहणार उपस्थित

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या रविवार दि. 17 रोजी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. 16 व 17 असे दोन दिवस त्यांचा कर्नाटक दौरा ठरला असून रविवारी दुपारी जनसेवक मेळाव्याच्या समारोप समारंभात ते भाग घेणार आहेत.

भाजपने त्यांच्या बेळगाव दौऱयाची जय्यत तयारी सुरू केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रविवारी पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, माजी मंत्री शशिकांत नाईक, डॉ. विश्वनाथ पाटील, जगदीश मेटगुड, उज्ज्वला बडवाण्णाचे व भाजपच्या इतर पदाधिकाऱयांनी जिल्हा क्रीडांगणाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, अमित शहा यांच्या जाहीर सभेला किमान तीन लाख कार्यकर्ते जमविण्याचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल आदींसह राज्यातील अनेक ज्ये नेते या मेळाव्यात भाग घेणार आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱया कार्यकर्त्यांना भोजनाची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था या विषयीही रविवारी भाजप नेत्यांनी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर शनिवारीही भाजप पदाधिकाऱयांची बैठक झाली होती.

इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन होणार!

बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱया पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, यासंबंधी उत्सुकता कायम आहे. एकीकडे काँग्रेसमध्ये दोन-तीन नावांची चर्चा सुरू आहे. भाजपची उमेदवारी सुरेश अंगडी यांच्या कुटुंबीयांना मिळणार की ऐनवेळी नव्या चेहऱयाला संधी देणार, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱयावेळी इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन होणार हे निश्चित आहे.

Related Stories

म.ए. युवा समिती कार्यकर्त्यांची सिव्हिल हॉस्पिटलला भेट

Amit Kulkarni

बसथांबा प्रवाशांसाठी की पार्किंगसाठी?

Amit Kulkarni

कर्नाटकात मंगळवारी ६,२५७ नवीन रुग्ण, ६,४७३ जणांना डिस्चार्ज

Abhijeet Shinde

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने मानले आभार

Patil_p

ट्रफिक सिग्नल पुन्हा बंद; रहदारी पोलीसही गायब!

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीजवळ शेतकऱयांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग

Patil_p
error: Content is protected !!