तरुण भारत

एक डोसच्या लसीद्वारेही अँटीबॉडीची निर्मिती

कोरोना विरोधात बळ वाढले : काही सेकंदांमध्ये समजणार लस घेतल्यानंतरचा प्रतिसाद

अमेरिकेत दोन विविध अध्ययनांमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात नवी माहिती प्राप्त झाली आहे. संशोधकांनी एक नॅनोपार्टिकल लस तयार केली असून ती सिंगल डोस दिल्यावरच विषाणूला नष्ट करणारा अँटीबॉडी रिस्पॉन्स विकसित करते. तर संशोधकांच्या अन्य पथकाने लसीचा शरीरावर कुठला प्रभाव पडला हे काही सेकंदांमध्ये शोधून काढण्याची पद्धत विकसित केली आहे. 

Advertisements

कोरोना लसीचे पहिले लक्ष्य स्पाइक प्रोटीन असून त्याच्या माध्यमातून कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करतो. अमेरिकेत सद्यकाळात दोन लसींना मंजुरी मिळाली असून या दोन्ही एमआरएनए लसी आहेत, ज्या मानवी पेशींमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्पाइक प्रोटीन तयार करतात. यामुळे इम्युन रिस्पॉन्स विकसित होतो आणि अँटीबॉडीची निर्मिती सुरू होत असल्याचे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पीटर किम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हटले आहे.

उंदरांवर यशस्वी नॅनापार्टिकल लस

एसीएस सेंट्रल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार पथकाने उंदरांवर स्वतःच्या लसीचे परीक्षण केले आहे. सिंगल डोसनंतरच उंदरांमध्ये कोरोना विषाणूतून बरे झालेल्या कॉन्वालेसेंट प्लाझ्माद्वारे दुप्पटीपेक्षा अधिक अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. हे प्रमाण स्पाइक प्रोटीनने इम्युनाइज करण्यात आलेल्या उंदरांच्या तुलनेत अत्यंत अधिक होते. 21 दिवसांनी दुसरा डोस दिल्यावर अँटीबॉडीची संख्या अधिकच वाढली आहे. स्पाइक/फेरिटीन नॅनोपार्टिकल्स कोरोनाच्या विरोधात सिंगल डोस लसीकरणासाठी व्यवहार्य रणनीति ठरण्याचे संशोधकांचे मानणे आहे.

3डी प्रीटिंगद्वारे नवे उपकरण

अमेरिकेच्या संशोधकांनी नवे नॅनोमटेरियल आधारित बायोसेंसिंग प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. हे केवळ काही सेकंदांमध्ये कोरोना विषाणुपासून बचावासाठी शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत की नाहीत हे सांगणार आहे. या उपकरणामुळे लसीच्या इम्युनोलॉजिकल रिस्पॉन्सचा अचूक अंदाज लावण्यास मदत मिळणार आहे. अमेरिकेच्या कार्नेगी मेलन विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक भारतीय वंशाचे राहुल पनात या संशोधनात सामील होते. नॅनोपार्टिकल 3डी प्रीटिंगसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उपकरण तयार केले असून ते अँटीबॉडीची तत्काळ ओळख पटविते. हे टेस्टिंग प्लॅटफॉर्म केवळ रक्ताच्या थेंबात (5 मायक्रोलिटर) विषाणूच्या दोन अँटीबॉडी-स्पाइक एस1 प्रोटीन आणि रिसेप्टर-बायंडिंग डोमेनच्या (आरबीडी) अस्तित्वाचा शोध लावते. याचा वापर करणेही सोपे असून निष्कर्ष स्मार्टफोनवरही मिळत असल्याचे पनात यांनी सांगितले आहे.

Related Stories

ट्रम्प यांच्यावरील ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाचा पहिल्याच दिवशी विक्रमी खप

datta jadhav

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 3.60 कोटींवर

datta jadhav

अल्फा, बीटा, गॅमा…

Patil_p

भारतातील 1600 हून अधिक कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक

datta jadhav

चीनने लपविली कोरोना विषाणूची माहिती

Patil_p

चीनने वाढवले संरक्षण बजेट

datta jadhav
error: Content is protected !!