तरुण भारत

सख्खे शेजारीमध्ये रंगणार अनोखा खेळ

  एक हक्काचं घर, आधाराचा हात आणि एक हाक देताच मदतीला धावून येणारा शेजारी लाभण म्हणजे भाग्यच. असं म्हणतात, कोसो दूर असलेल्या नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा. अडीअडचणीच्या काळात आपल्याला पहिल्याप्रथम आठवतो तो शेजारीच. सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दुरूखात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे, रक्ताची माणसं भेटत नाही, पण हक्काचा शेजारी लगेच धावून येतो. अशाच आपल्या जवळच्या शेजारी कुटुंबांसोबत रंगणार आहेत गप्पा. जेव्हा घरी येणार सख्खे शेजारी…. माणूसकीचं नातं चिरंतन टिकवून ठेवणाऱया शेजारधर्माचा सन्मान करणारा शेजारोत्सव म्हणजेच हा कार्यक्रम.

आपण आपल्या जीवाभावाच्या शेजाऱयाला किती ओळखतो, त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आणि याच शेजाऱयांसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी कलर्स मरा
ाr हा एक धम्माल शो सख्खे शेजारी 11 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्या 6.30 वाजता घेऊन येत आहे. महाराष्ट्राचा लाडका कलाकार चिन्मय उदगीरकर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. जे कुटुंब त्यांच्या शेजाघ्&यांविषयी अचूक माहिती सांगतील ते त्या भागाचे विजेते ठरणार आहेत  कार्यक्रमामध्ये विजेत्या कुटुंबाला 50 गफहउपयोगी गोष्टी, डिझायनर नेमप्लेट]िमळणार आहेत. याचसोबत सहभागी कुटुंबियांना गेममध्ये रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्टय़ असं की, चिन्मय उदगीकर या कार्यक्रमामध्ये येणाघ्&या कुटुंबासोबत हितगुज करणार आहे, त्यांच्याबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी जाणून घेणार आहे.

कार्यक्रमाविषयी बोलताना चिन्मय उदगीरकर म्हणाला, बऱयाच वर्षांपासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. सख्खे शेजारीसारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली मी खूप आनंदी आहे. मी आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलो. कलर्स मराठीसोबत माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे आणि मी पुन्हा एकदा या कुटुंबाशी जोडलो जातो आहे याचा मला खूप आनंद आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आता कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाद्वारे मी रसिक प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेमध्ये भेटायला येणार आहे, जे माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. या कार्यक्रमाद्वारे मला त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आहे हे माझ्यासाठी खूप खास आहे. इतकंच नसून यानिमित्ताने कलर्स मराठी कुटुंबाचा भाग होऊन मी कलर्स मराठीला लोकांच्या घरात घेऊन जाणार आहे, आणि कुटुंब मोठं करणार आहे. खरंतर मी खूप ऊत्सुकदेखील आहे…ऊत्सुक यासाठी की ज्या प्रेक्षकांनी माझ्यावर इतकी वर्ष भरभरून प्रेम केलं त्यांना मी चिन्मय उदगीकर म्हणून प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळणार आहे. मला खात्री आहे प्रेक्षकांचं प्रेम यावेळेस देखील तितकंच मिळेल.

Related Stories

प्लॅनेट मराठीवर 10 नव्या वेबसीरीज

Patil_p

दिग्दर्शक साकार राऊतचा नवा चित्रपट अजूनी

Patil_p

समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याची जीवनगाथा

Patil_p

विवादानंतर कंगनाला उपरती; कंगना म्हणाली…

pradnya p

चार तासांच्या चौकशीनंतर NCB कडून कॉमेडियन भारती सिंहला अटक

pradnya p

राधिकाने जागवल्या आठवणी

tarunbharat
error: Content is protected !!