तरुण भारत

कुटुंबियांनी घेतली विनय कुलकर्णी यांची भेट

न्यायालयाची परवानगी घेवून महिन्याभरात दुसरी भेट

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

जिल्हा पंचायत सदस्य योगीशगौडा खून प्रकरणी सध्या हिंडलगा कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आलेले माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी कारागृहात भेट घेतली. न्यायालयाची परवानगी घेऊन महिन्याभरात कुटुंबीयांनी दुसऱयांना त्यांची भेट घेतली.

10 डिसेंबर रोजी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या विनय कुलकर्णी यांना भेटण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी भेटीसाठी पुन्हा अर्ज दाखल केले होते. सोमवारी दुपारी 4 ते 5 यावेळेत त्यांची भेट घेण्यासंबंधी न्यायालयाने परवानगी दिली होती. या पार्श्वभूमिवर विनय कुलकर्णी यांची पत्नी शिवलीला व मुले सोमवारी दुपारी 4 वाजता धारवाडहून बेळगावला आले होते. केवळ दोघा जणांना भेटण्यासाठी न्यायालयाने अनुमती दिली होती. त्यामुळे मुलांना कारागृहाबाहेर थांबावे लागले. वडिलांना न भेटताच त्यांना घरी परतावे लागले..

Related Stories

संकेश्वरात बाप्पांना भावपूर्ण निरोप

Patil_p

दमदार पावसामुळे कंग्राळी खुर्द येथील जुना पूल पाण्याखाली

Patil_p

हिंडलग्यात मासिक बैठक घेण्यास सदस्यांचा विरोध

Omkar B

आरटीपीसीआरची सक्ती नागरिकांसाठी तापदायक

Patil_p

बिम्सला आणखी 11 लाखांची देणगी

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांना न्यायालयाकडून दिलासा

Amit Kulkarni
error: Content is protected !!