तरुण भारत

दिल्लीचा मुंबईवर 76 धावांनी विजय

वृत्तसंस्था/ मुंबई

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली संघाने बलाढय़ मुंबईचा 76 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात हरियाणाने आंध्रप्रदेशचा 6 गडय़ांनी पराभव केला.

Advertisements

मुंबई संघाने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 206 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईचा डाव 103 धावांत आटोपला. दिल्ली संघातील नितीश राणाने 37 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांसह 74 धावा जमविताना हिंम्मत सिंगसमवेत तिसऱया गडय़ासाठी 122 धावांची भागिदारी केली. हिंम्मत सिंगने 32 चेंडूत 53 धावा झळकविल्या. सलामीचा फलंदाज शिखर धवनने 23 तर हितेन दलालने 24 धावा जमविल्या. दिल्लीच्या या सलामीच्या जोडीने पहिल्या चार षटकांत 38 धावा झोपडपल्या. दिल्लीची स्थिती एकवेळ 2 बाद 56 अशी होती. हिंम्मत सिंगने आपल्या 53 धावांच्या खेळीमध्ये 3 चौकार ठोकले. मुंबई संघातर्फे मुलानीने 43 धावांत 2 गडी बाद केले. दिल्लीच्या सांगवान आणि इशांत शर्मा यांच्या अचूक गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव 103 धावांत आटोपला. मुंबईचा निम्मा संघ 52 धावांत बाद झाला होता. जस्वालला खाते उघडता आले नाही. अदित्त्य तरेने 3, सुर्यकुमार यादवने 7,  सिद्धेश लाडने 4, सर्फराज खानने 15 धावा जमविल्या. अष्टपैलू शिवम दुबेने एकाकी लढत देत 42 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 63 धावा जमविल्या. दिल्लीतर्फे सांगवानने 20 धावांत 3, इशांत शर्माने 16 धावांत 2 गडी बाद केले.

या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात हरियाणाने आंध्रप्रदेशचा 6 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आंध्रप्रदेशने 20 षटकांत 6 बाद 107 धावा जमविल्या. रिकी भुईने 39, भरतने 23 धावा केल्या. हरियाणातर्फे जयंत यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर हरियाणाने 4 बाद 108 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला. बिस्नॉयने नाबाद 42 आणि चौहानने 35 धावा केल्या. आंध्रप्रदेशतर्फे नरेन रेड्डीने 4 धावांत 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली 20 षटकांत 4 बाद 206, मुंबई सर्वबाद 130

आंध्र प्रदेश 20 षटकांत 6 बाद 107, हरियाणा 4 बाद 108.

Related Stories

भारतीय मुष्टीयुद्ध संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी राणा

Patil_p

कौंटी पुनरागमनासाठी जोफ्रा आर्चर सज्ज

Amit Kulkarni

हरियाणा संघाला महिला हॉकीचे जेतेपद

Patil_p

मुख्यमंत्री पटनाईक यांच्याकडून दुती चंदचे अभिनंदन

Patil_p

अजय जयरामला डेन्मार्क स्पर्धा हुकणार?

Patil_p

अमेरिकेच्या ऍथलेटिक्स संघाचे जपानमधील सराव शिबीर रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!