तरुण भारत

संजयनगर येथे पन्नास हजाराची चोरी

चोरट्यांनी घराच्या वरच्या मजल्याच्या खोलीमधून प्रवेश केला

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

सांगली शहरातील संजयनगर येथे 46 हजार 400 रूपयांची चोरी झाली. सुरेश केशव नागावकर वय 56, रा. ताराई पार्क यांच्या घराच्या वरच्या मजल्याच्या खोलीमधून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील 26 हजार 400 रूपये रोख रक्कमेसह 46 हजार 400 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत नागावकर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नागावकर यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा चुकून उघडा राहिला होता. या खोलीमधून चोरटे आतमध्ये शिरले. त्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरातील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 46 हजार 400 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीसांच्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Related Stories

सांगली : रामलिंग बेट येथे नदीपात्रात बालिका बुडाली

Abhijeet Shinde

राज्यसेवा पुर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू : जिल्हादंडाधिकारी

Sumit Tambekar

सांगली : मिरजेत मित्राचा खून करणाऱ्यास अटक

Abhijeet Shinde

सांगली : केंद्रीय जल आयोगाकडून संभाव्य महापूराच्या नियोजनाची लगबग

Abhijeet Shinde

सुभाषनगर येथे अपघात, क्रेनखाली सापडून वृद्धा ठार

Abhijeet Shinde

सोलापूर : आंदोलनकर्त्यांनी बार्शी नगराध्यक्ष तांबोळी यांचे केले गांधीगिरीने स्वागत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!