तरुण भारत

तुर्कस्तानच्या अध्यक्षांचा व्हॉट्सऍपवर बहिष्कार

नव्या खासगीत्व कायद्याचे निमित्त :

वृत्तसंस्था / अंकारा

Advertisements

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांच्या माध्यम कार्यालयाने समाजमाध्यम व्यासपीठ व्हॉट्सऍपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने देखील व्हॉट्सऍपचा वापर करणार नसल्याचे म्हटले आहे. व्हॉट्सऍपने अलिकडेच नवे खासगीत्व धोरण लागू केले असून त्याचा स्वीकार न केल्यास वापरकर्त्याचे खाते डिलिटही केले जाऊ शकते. तर या धोरणाला मान्यता दिल्यास वापरकर्त्याचा विदा फेसबुकसह कंपनीच्या अनेक प्लॅटफॉर्म्सना उपलब्ध होणार आहे. या धोरणामुळे वापरकर्ते विदा सुरक्षेवरून चिंतेत आहेत.

एर्दोगान यांनी 11 जानेवारी रोजी स्वतःच्या व्हॉट्सऍप ग्रूप्सना एन्क्रिप्टेड मेसेजिंग ऍप बीआयपीवर हस्तांतरित करण्याचा आदेश दिला आहे. बीआयपी तुर्कस्तानचे एक एन्क्रिप्टेड मेसेजिंग ऍप असून त्याची मालकी टर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएसकडे आहे. सर्व लोकांना आता बीआयपीवर निर्मित खात्याद्वारे अध्यक्षीय कार्यालय तसेच संरक्षण मंत्रालयाकडून माहिती देण्यात येणार आहे.

तुर्कस्तानात बहिष्काराची मोहीम

अध्यक्षांनी व्हॉट्सऍपला  रामराम ठोकल्यावर तुर्कस्तानात या अमेरिकन समाजमाध्यम कंपनीच्या विरोधात आवाज तीव्र झाला आहे. तुर्कस्तानातील लोक व्हॉट्सऍप सोडून बीआयपी ऍप वापरत आहेत. मागील 24 तासांमध्ये सुमारे 10 लाख नवे वापरकर्ते बीआयपी मेसेंजरशी जोडले गेले आहेत. हा ऍप 2013 मध्ये सादर झाला असून आतापर्यंत 53 दशलक्षापेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आल्याची माहिती तुर्कसेल कंपनीने दिली आहे.

व्हॉट्सऍपचे नवे धोरण

व्हॉट्सऍपने नव्या वषांत स्वतःच्या खासगीत्व धोरणाला अपडेट केले आहे. हे धोरण स्वीकारण्यासाठी वापरकर्त्याला कंपनीकडून नोटिफिकेशन पाठविली जात आहे. वापरकर्त्याने 8 फेब्रुवारीपर्यंत धोरण न स्वीकारलयास त्याचे खाते डिलिटही होऊ शकते. नवे धोरण स्वीकारल्याने खासगीत्वावरील धोका वाढणार आहे, कारण व्हॉट्सऍपवरील सर्व सामग्रीवर देखरेख ठेवली जाणार आहे.

व्हॉट्सऍपचा तर्क

कुठली सामग्री अधिक फॉरवर्ड केली जातेय हे धोरणामुळे कंपनीला कळणार आहे. बनावट वृत्तांचा माग काढणे सोपे होईल. तसेच वाणिज्यिक संकेतस्थळांच्या उत्पादनांचे स्टेट्स शेअर करता येतील. यातून फेसबुक-इन्स्टाग्रामही त्याच्याशी संबंधित जाहिराती दाखवेल, कुणाचेही वैयक्तिक संभाषण प्रभावित होणार नसल्याचे व्हॉट्सऍपकडून म्हटले गेले आहे.

धोरणावरून वाद

व्हॉट्सऍप लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. स्मार्टफोनचा वापर करणाऱया प्रत्येक व्यक्तीकडून हे ऍप वापरले जाते. परंतु आता याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विदावर नजर राहणार आहे. यात जाहिरातींचा विदा, खरेदीचा इतिहास, कोर्स लोकेशन, क्रॅश डाटा, गॅलरी, परफॉर्मन्स डाटा यासारख्या माहितींचा समावेश आहे.

Related Stories

जगावर आर्थिक मंदीची गडद छाया

prashant_c

चीनमध्ये डॉ.कोटणीस यांच्या स्मृतींना उजाळा

Omkar B

कोरोना, हिवाळा प्रदूषणाचा तिहेरी मारा

Patil_p

इटलीतही कोरोनावरील लस विकसित

Patil_p

सिंगापूरमध्ये 4800 भारतीयांना कोरोनाची बाधा

datta jadhav

हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबियाचे नवे नियम

datta jadhav
error: Content is protected !!