तरुण भारत

नाभिक समाजासाठी आमदार पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रतिनिधी / आटपाडी

कोरोना संकट कालावधीत राज्यातील नाभिक समाज बांधव अडचणीत आले. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने श्री संत सेना महाराज महामंडळ स्थापन करावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Advertisements

कोरोना काळात आत्महत्या केलेल्या १४ नाभिक व्यवसाय चालकांनी सरकारने मदत करावी. नाभिक समाजातील गरजूंना अल्पव्याजदराने कर्ज द्यावे. सरकारकडून कोणतीही योजना नाभिक समाजासाठी नाही. हबीब सारख्या अनेक मोठ्या ब्रँडेड सलूननी बाजारात प्रवेश केलाय. त्यामुळे सामान्य नाभिक व्यवसायिकांच्या पोटावर पाय आला आहे. अद्ययावत नाभिकी व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी संस्था निर्माण कराव्यात.

या मागण्यांसोबतच प्रति शिवाजी शूरवीर शिवा काशीद यांच्या स्मरकाकडे दुर्लक्ष न करता तेथे सुविधा द्याव्यात, अशी मागणी करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारचे नाभिक समाज्याकडे लक्ष वेधण्याचा पत्राद्वारे प्रयत्न केला आहे.

Related Stories

Navaratri : यंदा नवरात्रचा उपवास महागला

Abhijeet Shinde

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांवर गुन्हा

Abhijeet Shinde

मिरजेत ऍसिड गोडाऊनमध्ये स्फोट

Abhijeet Shinde

97 विद्यार्थ्यांच्या ओमायक्रॉन अहवालाची प्रतिक्षाच

Sumit Tambekar

सांगली : जयहिंद सोसायटीच्या अध्यक्ष-सचिवांना कारवाईची नोटीस

Abhijeet Shinde

आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या-निवासी उपजिल्हाधिकारी

Sumit Tambekar
error: Content is protected !!