तरुण भारत

सोलापूर येथे ‘जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार’ सोहळा संपन्न

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जुळे सोलापुरातील जगदीश श्री लॉन्समध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, इतिहास अभ्यासक डॉ. गाजरे, जगदीश लोणचे, विजयेंद्र शिखरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष श्याम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisements

राष्ट्रमाता जिजाऊंना वंदना करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आपल्या मुलांना उच्च शिक्षण व संस्कार देऊन समाजामध्ये उच्च पदावर विराजमान करणाऱ्या आधुनिक जिजाऊ म्हणून उज्वला दत्तात्रय गोडसे, शिवमती लोचना, नागनाथ कदम, शिवमती रुक्मिणी, तानाजी हवे यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण दादा गायकवाड यांच्या यांच्या आदेशान्वये संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या प्रमुख पदी वैभवी पवार, उपाध्यक्षपदी शीतल मोरे, सर जिल्हा कार्याध्यक्षपदी अमिता जगदाळे यांची निवड करण्यात आली. राजमाता माँसाहेब जिजाऊ या स्त्रियांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील पहिल्या महिला होत्या.

धर्मशास्त्राने निषिध्द ठरविलेल्या व निर्वंश होण्याची दहशत पसरविलेल्या भूमिवर एकुलत्या एका मुलाला नांगरणी करायला लावणारी जिजाऊ या सांस्कृतिक व धार्मिक दहशतीतून रयतेला बाहेर काढणाऱ्या पहिल्या क्रांतिकारी स्त्रीची प्रेरणा सर्व स्त्रियांनी घ्यावी असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम कदम यांनी तर आभार प्रदर्शन अजित शेटे यांनी केले.

Related Stories

सोलापूर : दुधनीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 453 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

नगरमध्ये युद्धप्रात्यक्षिकांचा थरार

prashant_c

सोलापूर : नुतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा

Abhijeet Shinde

‘रेमडेसिवीर’च्या घोळामुळे पालकमंत्री भरणे संतापले

Abhijeet Shinde

सोलापुरात फोफावतोय डेंग्यू, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!