तरुण भारत

सांगली : मिरजेत मित्राचा खून करणाऱ्यास अटक

आर्थिक कारणातून झाला होता खून

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

पैशाच्या कारणातून मुनिर मुसा शेख उर्फ मुन्ना मांगलेकर (वय 36, रा. बोलवाड रोड, मिरज) याचा खून केल्याप्रकरणी रियाज उर्फ राजू गौस शेख उर्फ लसूण राजा (वय 42, रा. रेवणी गल्ली, मिरज) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 4 तासात अटक केली आहे. शहरातील माणिकनगर येथे हॉटेल सनशाईन या बारमध्ये सोमवारी रात्री हा खून झाला होता. मित्रानेच मित्राचा खून केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत मुनिर उर्फ मुन्ना मांगलेकर आणि रियाज उर्फ राजू शेख हे दोघे एकमेकांचे मित्र होते. मुन्ना याच्या वाळू विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने राजू याला काही पैसे दिले होते. मुन्ना ते पैसे परत मागत होता. या कारणातून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वादावादी सुरू होती. यापूर्वीही अनेकवेळा किरकोळ स्वरूपात भांडणे झाली होती. तेव्हापासून सदर दोघांमध्ये धुसफूस सुरूच होती. सोमवारी रात्री आठच्या सुमारास मुन्ना आणि राजू हे दोघे हॉटेल सनशाईनमध्ये दारू पित बसले होते. त्यावेळी मुन्ना याने पैशांचा तगादा लावला. त्यावेळी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. यावेळी राजू याने त्याच्याजवळील धारधार हत्याराने मुन्ना मांगलेकर याचा खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Related Stories

विटा नगरपालिकेत गरजूंसाठी मदत केंद्र सुरू : अ‍ॅड. वैभव पाटील

Abhijeet Shinde

नागठाणे बंधारा पाण्याखाली

Abhijeet Shinde

‘अलमट्टी’च्या विसर्गाबाबत कर्नाटकशी समन्वय

Abhijeet Shinde

सांगली : गोटखिंडीत मशिदीमध्ये शिवजयंती !

Abhijeet Shinde

बेळंकीत पॉझिटिव्ह महिलेनेच वाढली पंगत, जेवलेल्यांचा शोध सुरू

Abhijeet Shinde

सांगली शहर अंधारात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!