तरुण भारत

विडंबनाचे हसरे रूप प्रकट होणे आवश्यक

विडंबनकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

‘एखाद्या गहन गंभीर आशयपूर्ण असणाऱया कलाकृतीचा मूळ आकृतीबंध तसाच ठेवून शाब्दिक फेरफार करून त्याचे रुपांतर हास्यात करणे म्हणजे विडंबन होय’. ही विडंबनाची व्याख्या विडंबनकाराला माहीत असायला हवी. तरच त्याचे हसरे रूप उभे करता येते, असे मत विडंबनकार कवी डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ‘काव्यावर्त’ या काव्य लेखन कार्यशाळेत सोमवारी ‘विडंबन’ या विषयावर डॉ. कुलकर्णी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. विडंबन म्हणजे काय? ते कसे करावे, गाजलेली विडंबने कोणती याबद्दल त्यांनी विस्तृत विवेचन केले.

ते म्हणाले, कवितेचे अनेक प्रकार आहेत. पण प्रत्येक प्रकार आपापल्या जागी श्रे÷ आहेत. विडंबन गीताला आचार्य अत्रे यांनी प्रति÷ा मिळवून दिली. 1925 मध्ये त्यांच्या ‘झेंडूची फुले’ या विडंबन संग्रहाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. विडंबनकाराला मूळ कविता माहीत असणे आवश्यक आहे. शिवाय ज्या कविता किंवा गीताचे विडंबन कवी करणार आहे ते गाजलेले असायला हवे.

शाब्दिक फेरफार करून तयार झालेल्या विडंबनाचे रुपांतर हास्य रसात व्हायला हवे. तरच त्याचे हसरे रूप विरोधाभासासह पुढे येवू शकते. विडंबन वाचताना रसिकालासुद्धा मूळ कविता आठवत रहायला हवी. म्हणजे दुहेरी आस्वाद रसिकाला घेता यायला हवा. असे सांगून ते म्हणाले, राजकीय व्यंग किंवा दंभ स्फोट विडंबन, पूरक किंवा पोषक विडंबन असे विडंबनाचे प्रकार आहेत.

विडंबन किंवा हास्य काव्य ऐकण्यासाठी मनाची बैठक भारतीय हवी. मन मोकळे असायला हवे. सुसंगती समजली की, विसंगती समजते. उचितता समजली की विजोडता समजते. विडंबन करण्यासाठी प्रथम सुप्रसिद्ध गीतांची निवड करणे, मूळ आकृतीबंध कायम ठेवणे, कलम करण्यास जागा ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विनोद हा कारूण्यावर आधारित असतो. तो सहज आणि मिश्कील हवा. अन्यथा त्याचे बुमरँग होऊ शकते. ओढून ताणून केलेला विनोद हा केविलवाणा ठरतो. विडंबनाला शॉर्टकट नसतो. हास्यरसाच्या जवळ विभत्स रस आहे. त्यामुळे विडंबन केवळ हास्य निर्माण करेल, त्याने मने दुखवणार नाहीत, याची काळजी घेऊनच विडंबन केले जावे, असे डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी नमूद केले. तसेच काही विडंबन गीते सादर केली. त्यांचा परिचय करून देऊन संजीवनी खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

डांबरीकरण केलेला रस्ता काही दिवसातच खचला

Patil_p

शहापूर, अनगोळ परिसरात पथसंचलन

Amit Kulkarni

हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षांत समारंभ

Amit Kulkarni

शंकरगौडा पाटील यांनी दिल्लीत स्वीकारली सुत्रे

Patil_p

हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Patil_p

अनगोळ येथील ‘त्या’ गळतीची तातडीने दुरुस्ती

Omkar B
error: Content is protected !!