तरुण भारत

बेळगावात पहाटे पहाटे लस दाखल

बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधक लस घेऊन पुण्याहून निघालेले वाहन बुधवारी पहाटे 5 वाजता व्हॅक्सिन डेपोमध्ये दाखल झाले. आरोग्य विभागाने हे वाहन घेऊन आलेल्या चालकांचे आणि अन्य कर्मचार्‍यांचे उस्फुर्त स्वागत केले. विशेष म्हणजे यावेळी खास बँड लावून त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. व्हॅक्सिन डेपो येथील आरोग्य खात्याच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी वाहन चालकाचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे खास स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आदी उपस्थित होते. या पद्धतीने सदर वाहनातून पहिल्या टप्प्यात एकूण 35 हजार लस बेळगावला आल्या आहेत.

Related Stories

मुचंडी येथे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Patil_p

मॅक्सिकॅब वाहनांचा कर माफ करावा

Patil_p

कागवाड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

Patil_p

प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक सेवा पुरवा

Omkar B

बेळगावातील फुटबॉलला नवसंजीवनी द्या

Patil_p

जिल्हय़ातील आणखी 15 जण कोरोनामुक्त

Patil_p
error: Content is protected !!