तरुण भारत

ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगावर आज मतदान

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिकने लोकप्रतिनिधी सभागृहात मांडलेेल्या महाभियोगाच्या ठरावावर आज मतदान होणार आहे. 

डेमोक्रॅटिक पक्षाकडे लोकप्रतिनिधीगृहात बहुमत आहे. मात्र, हा ठराव मंजूर करण्यासाठी दोन तृतियांश बहुमताची गरज असते. सध्या सभागृहात दोन्ही पक्षांची 50 टक्के मते आहेत. त्यामुळे या मतदानाकडे अमेरिकेसह जगाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने पाच ते सहा दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी संसदेच्या इमारतीमध्ये गोंधळ घातला. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला होता. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्या हजारो समर्थकांसमोर केलेल्या भाषणामुळे हिंसाचाराला चिथावणी मिळाल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. 

ट्रम्प यांच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा जगभरातून निषेध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्याचा ठराव मांडला गेला आहे.

Related Stories

ब्राझीलमध्ये 68.75 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी

datta jadhav

महागाईचा भडका : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग नवव्या दिवशी वाढ

pradnya p

उत्तराखंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 2344

pradnya p

चिनी लष्कराच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी झँग शुडाँग

datta jadhav

टोळधाड : पुढील चार आठवडे भारताला अतिदक्षतेचा इशारा

datta jadhav
error: Content is protected !!