तरुण भारत

ड्रग्ज प्रकरण : नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने पाठवले समन्स

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स पाठवले असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार,  ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचे नाव समोर आले आहे. त्यानंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स पाठवले. त्यानुसार समीर खान आज सकाळी एनसीबी कार्यालयात हजर राहिले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात एनसीबीने करण सजनानी नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही जप्त करण्यात आला होता. त्याचप्रकरणी चौकशीदरम्यान बऱ्याच लोकांचे नाव समोर आले होते. त्यात समीर खान यांचेही नाव उघड झाले. त्यामुळे मंगळवारी (12 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास एनसीबीच्या एक टीमने वांद्र्यात जाऊन समीर खान यांना समन देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार समीर खान आज (13 जानेवारी) सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. 

Related Stories

बलात्काराची धमकी देत चोरी

Patil_p

प्रकाश पाटील यांचा प्रचाराचा झंझावत आणि वाढता पाठिंबा

Patil_p

सांगली : सख्या भावाने दगडाने ठेचून केली भावाची हत्या

Abhijeet Shinde

हातकणंगले काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीबाबत तहसीलदारांना निवेदन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गोकुळचे दुध संकलन सुरू राहणार

Abhijeet Shinde

जमत नसेल तर सत्ता सोडा,चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!