तरुण भारत

इचलकरंजीतील उत्तम चौगुले खुनाचा छडा लावण्यात यश

प्रतिनिधी / इचलकरंजी

सुमारे दोन महिन्यापूर्वी शहरातील लायकर मळ्यात उत्तम राजाराम चौगुले (वय ४६) या खुनाचा इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला छडा लावण्यास यश आले आहे. खूनप्रकरणी एका युवकाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. नझीर रशीद मुलाणी (रा. लिंबू चौक, इचलकरंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी पत्रकार बैठकीत दिली. पत्रकार बैठकीस पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळीक आदी उपस्थितीत होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील संजय लायकर यांच्या मालकीच्या लायकर मळ्यात जनावरच्या गोटा आहे. या गोठ्याची निगा राखण्यासाठी मृत उत्तम चौगुलेला कामाला ठेवले होते. तो गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री जनावरांना चारा घालुन गोट्यामध्ये झोपला. त्यावेळी त्यांच्यावर संशयीत आरोपी नझीर रशीद मुलाणी यांने खूनी हल्ला केला.

Advertisements

या हल्लानंतर मुल्लाणीने घटनास्थळावरुन पलायन केले होते. या हल्ल्याची माहिती समजताच गोटा मालक लायकर यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी चौगुलेला उपचारासाठी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले पण गळा चिरल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्यामुळे पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. पण उपचारादरम्यान त्याचा शनिवारी (७ नोव्हेंबर) दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात अज्ञाताविरोधी खूनाचा गुन्हा नोंद झाला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाकडून या खूनातील हल्लेखोरांचा शोध सुरु होता. पण या पथकाला हल्लेखोरांचा शोध लावण्यास यश न आल्याने यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी पोलीस उपाअधीक्षक कार्यालयाकडे वर्ग केला.

पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विकास जाधव यांनी या खूनाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून संशयीत आरोपी मुल्लाणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने चौगुलेचा खून केल्याची कबुली दिली.

Related Stories

खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर – ट्राॅली उलटली

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांत सक्रीय रूग्णसंख्या दुप्पट

Abhijeet Shinde

तब्बल दहा दिवसांनी ‘या’ चार आगरातून धावली एसटी

Sumit Tambekar

कोल्हापूर : चौथ्या टप्प्यात साडेअकरा लाख जणांना देणार कोरोना लस

Abhijeet Shinde

`जुन्या पेन्शन योजने’साठी सरकारी कर्मचारी रस्त्यावर

Abhijeet Shinde

कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लसीकरणाला पुढे या : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!