तरुण भारत

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण कार्यक्रम सरकारने पुढे ढकलला

बेंगळूर/प्रतिनिधी

१७ जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन (एनआयडी) आयोजित करण्यात येतो. तथापि, सरकारने पुढील सूचना येईपर्यंत पोलिओ लसीकरण कार्यक्रम तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमात ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओ थेंब दिले जातात.

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य विभागातील प्रधान सचिवांना एक पत्र पाठविले. काही कारणास्तव नियोजित पोलिओ एनआयडी (राष्ट्रीय लसीकरण दिवस) मोहीम पुढील नोटीसपर्यंत १७ जानेवारी २०२१ पासून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी १७ जानेवारी रोजी पोलिओ लसीकरण केले जाईल, असे नमूद केले होते.

दरम्यान, १६ जानेवारीपासून देशभरातील कोविड -१९ लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. कोविड -१९ ही लस प्रथम अग्रभागी कामगार आणि आरोग्य कामगारांना दिली जाईल. मग ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल, त्यानंतर साथीच्या परिस्थितीवर आधारित इतरांना लस दिली जाणार आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात 162 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1922 वर

pradnya p

ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱया स्थानी

Patil_p

अयोध्येतील राममंदिराच्या प्रसादाचे लाडू दुतावासांमार्फत जगभरात वाटणार

datta jadhav

पँगाँग सरोवराजवळ भारताने तैनात केले मरीन कमांडो

datta jadhav

कोरोनाचा आणखी एक बळी; एकाची आत्महत्या

Patil_p

8 वषीय चिमुरडीवर मेरठमध्ये अत्याचार

Patil_p
error: Content is protected !!