तरुण भारत

पुणे विभागातील 5 लाख 49 हजार 915 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे विभागातील 5 लाख 49 हजार 915 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 72 हजार 856 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 7 हजार 117 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 824 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.76 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 70 हजार 228 रुग्णांपैकी 3 लाख 55 हजार 988 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 5 हजार 410 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.15 टक्के आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 लाख 72 हजार 743 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 72 हजार 856 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Related Stories

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

pradnya p

तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या : शरद पवार 

pradnya p

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् ॲपद्वारे माहिती द्या

pradnya p

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 105 नव्या रुग्णांची भर

Shankar_P

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ति वाढवा : रामदेव बाबा

Shankar_P

नामदेव अंतरपाट संस्थेतर्फे उद्या ऑननलाईन वधू-वर परिचय मेळावा

pradnya p
error: Content is protected !!