तरुण भारत

महाराष्ट्रात एका दिवसात 238 पक्षांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


एकीकडे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू मुळपदावर येत असतानाच आता महाराष्ट्रात बर्ड फ्लू चे संकट गडद होताना दिसत आहे.


पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज एका दिवसात 238 पक्षांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत 2 हजार 096 पक्षांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी 8 जानेवारी पासून ते आतापर्यंतची आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, बीड, अकोला, लातूर, गोंदिया आणि चंद्रपूर भागातील पक्षांचे नमुने बर्ड फ्लू संसर्गाचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात तब्बल 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने नुकतीच दिली होती. 

Related Stories

कोल्हापूर : बांधकाम कामगारांना ३ हजार रुपये कोविड अनुदान मिळणार : दिलीप वळसे-पाटील

triratna

लॉकडाऊनला विरोध : मार्केट 9 ते 7 सुरु ठेवण्याची मागणी

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी दोनपर्यंत १४४ पॉझिटिव्ह

Shankar_P

पाटगाव परिसरात विक्रमी पावसाची नोंद

Shankar_P

कोल्हापूर : वळीवडेत गावठी दारूसाठा जप्त; तरुणावर गुन्हा

triratna

सोलापूर : रेशन घोटाळ्याच्या मुळावरच खासदार ओमराजे यांचा घाव

Shankar_P
error: Content is protected !!