तरुण भारत

नागठाणेत काँग्रेसच्या नागेश्वर पॅनेल येथील दोन जागा बिनविरोध

काँग्रेसचे उमेदवारांच्या विरोधात भाजपचे एकापेक्षा एक सरस उमेदवार रिंगणात…
अपक्ष उमेदवारांमुळे राजकीय कटकारस्थाला उधाण…
काँग्रेसमधील गटबाजीला उधाण…..

शरद माने / वाळवा

Advertisements

पलूस तालुक्यातील नागठाणे ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या जोर धरताना दिसत आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी ही दुरंगी निवडणूक होत असून स्थानिक पातळीवर दोन पॅनेलवर ही निवडणूक लढवली जात आहे. काँग्रेसने नागेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातुन सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत तर भारतीय जनता पार्टीला परिवर्तन पॅनेल मधुन फक्त तीन १२ जागावरच उमेदवार देता आले. ३ जागांवर त्यांना उमेदवार देता आले नाहीत. काँग्रेसचे उमेदवारांच्या विरोधात भाजपचे एकापेक्षा एक सरस उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. १५ जागांपैकी दोन जागा या काँग्रेसने बिनविरोध जिंकल्या असल्याचे दिसत आहे.

प्रभाग २ मधील वृषाली प्रशांत पाटील, दिपाली निवास माने या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्यावतीने बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदी आनंद दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शंभर टक्के काँग्रेस जिंकणार आणि ग्रामपंचायतवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार, असा विश्वास व्यक्त होताना दिसत आहे.

प्रभाग ३ मध्ये उमेदवार जाडापाडीसाठी अपक्ष उमेदवार उभारल्याचे दिसते, उमेदवारांमुळे राजकीय कटकारस्थाला गावात उधाण आले आहे. काँग्रेस एकदिलाने लढणे अपेक्षित असताना काँग्रेसमधील गटबाजीला उधाण आले आहे असे दिसत आहे.
प्रभाग एक मध्ये काँग्रेसच्या ग्रामविकास पॅनेलचे नागेश्वर जगन्नाथ भानुदास थोरात विरुद्ध भाजप परिवर्तन पॅनेलचे भिकाजी भगवान साळुंखे, ग्रामविकासच्या लांडगे विरुद्ध परिवर्तन पॅनेलच्या जयश्री दत्तात्रय जठार, आशाताई संदीप जाधव विरुद्ध परिवर्तन पॅनेलच्या अर्चना रामचंद्र जाधव अशी लढत होत आहे,

प्रभाग २ मध्ये काँग्रेसचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते कुमार गणपती शिंदे हे कपबशी चिन्हावर लढत आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात संजय लक्ष्‍मण सुतार भाजपच्या परिवर्तन पॅनेलमधून निवडणूक लढवीत आहेत.

या प्रभागात २ जागा बिनविरोध झाल्याने केवळ एका जागेसाठी येथे मतदान होईल, प्रभाग ३ मध्ये भाजपचे व काँगेसचे बंडखोर उमेदवार मिळुन ९ उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून, काँग्रेसचे सचिन भीमराव देसाई, जयश्री नागनाथ देसाई, अर्चना राजेंद्र बनसोडे काँग्रेसतर्फे मैदानात आहेत. भाजप परिवर्तन तर्फे अरुण देसाई, बनसोडे मैदानात आहेत. या प्रभागात भाजप परिवर्तनला उमेदवारच मिळाला नाही त्यामुळे भाजपला नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.

प्रभाग ३ मध्ये समीना रज्जाक कोरबी, करिष्मा इलाही जमादार, सोनाबाई नागेश शिंदे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग ४ मध्ये साईराज जयवंत पाटील विरुद्ध भाजपचे इंद्रजीत बाजीराव पाटील, काँग्रेसच्या अलका शिवाजी जाधव विरुद्ध भाजपच्या शुभांगी संजय कणसे, काँग्रेसचे राजाराम पांडुरंग मदने विरुद्ध भाजपचे नागनाथ भाऊ मदने अशी निवडणूक होत आहे. प्रभाग ५ मध्ये विजय शंकर माने विरुद्ध भाजपचे सत्यजीत विजय पाटील, विलास सिताराम पाटील विरुद्ध भाजपचे सागर शिवाजी पाटील, संयुक्ता संजय साळुंखे विरुद्ध भाजपच्या सुनिता विकास शिंदे या ठिकाणी निवडणूक लढवीत आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी आपले कसब पणाला लावल्याचे दिसत आहे. उमेदवारांचा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर जास्त जोर दिसत असून, सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रचार होत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात भाजपचे एकापेक्षा एक भारी उमेदवार भाजपने दिल्याने या निवडणुकीमध्ये काय चित्र उभे राहणार ? भाजप काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचणार का ? काँग्रेस आपला बालेकिल्ला लढवुन परंपरेनुसार ताब्यात ठेवणार का ? या विषयी नागठाणे गावामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये चर्चा झडताना दिसत आहे.

Related Stories

फुकट्या रेल्वे प्रवाशांना १७ लाखांचा दंड

Abhijeet Shinde

सांगली : जिल्ह्याचा दहावीचा विक्रमी ९७.२२ टक्के निकाल

Abhijeet Shinde

नांद्रेत लस संपल्याने लसीकरण थांबले

Abhijeet Shinde

जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे आठ जागा जिंकत सत्तांतर

Abhijeet Shinde

फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांना १९ किलोमीटर धावून वाहिली अनोखी श्रद्धांजली

Abhijeet Shinde

केंद्रीय जलआयोगाकडून पहिल्यांदाच भीमा नदीची मोजमाप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!