तरुण भारत

शिरोळ पालिकेची वसुली फक्त वीस टक्के

विकास कामावर विपरीत परिणाम कर भरण्याचे आवाहन

प्रतिनिधी / शिरोळ

Advertisements

शिरोळ येथील नगर पालिकेची करवसुली फक्त 20 टक्के झालेली आहे. त्यामुळे विकास कामांवर त्याचा परिणाम होत आहे. या नगरपालिकेची एक कोटींचे उत्पन्न आहे. सहा फेब्रुवारी 2018 रोजी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत झाले. ग्रामपंचायतीच्या काळातील ऐंशी लाख रुपये थकबाकी आहे. 2019 साली महापुराचा फटका बसला तर 2020 साली कोरोना विषाणू थैमान मांडले होते. त्यामुळे सलग दोन वर्ष वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे.

शिरोळ नगरपालिकेचे एक कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न आहे. चालू वर्षी वीस टक्केच करवसुली झाले असल्याने अद्याप 80 टक्के वसुली होणे अवाश्यक आहे. पालिकेने 31 मार्चपूर्वी शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आले आहे. सध्या पालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारावर तेरा लाख रुपये खर्च होतो. यासाठी शासनाकडुन चार लाख 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते. तर मासिक साडेसात लाख रुपये पालिकेच्या उत्पन्नातून पगारा पोटी देण्यात येते तर घराच्या नोंदी सहा हजार आहेत. तसेच पाच हजार पाचशे नळ कनेक्शन धारक आहेत.   

नगरपालिकेच्या नियमानुसार वेगवेगळ्या तीन करांची आकारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रोजगार हमी कर शिक्षण कर व घनकचरा कर यांचा समावेश आहे. सध्या नगरपालिकेवर कर वसुलीचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम देखभाल दुरुस्ती व विकास कामावर होत असल्याचे कार्यालय निरिक्षक संदीप चुडमुगे यांनी तरुण भारत प्रतिनिधींशी बोलताना नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी व अन्य कर करून पालिके सहकार्य करावे व जप्तीचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहनही केले. 

Related Stories

दुप्पट परताव्याच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे १८२४ नवे रुग्ण, ३३ बळी

Abhijeet Shinde

चुकीच्या पिक पंचनाम्यास शेतकऱ्यांचा विरोध

Abhijeet Shinde

रेल्वे स्टेशनवर आंदोलक-पोलिसांत झटापट

Abhijeet Shinde

‘त्या ‘ रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल महत्त्वाचे ठरणार

Abhijeet Shinde

नागदेववाडी पेयजल योजना भ्रष्टाचार सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!