तरुण भारत

निस्सानच्या कार उत्पादनात होणार घट

टोकीयो

 कार निर्माती कंपनी निस्सान मोटर्सने येणाऱया काळात वाहन उत्पादनात घट होणार असल्याचे म्हटले आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवडय़ामुळे कार निर्मितीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनी सध्या नोट ही अधिक विक्रीची लोकप्रिय गाडी निर्मिती करते आहे. या कारच्या निर्मिती प्रक्रियेला विलंब होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे  जपानमधील होंडा मोटर्सच्या कार उत्पादनातही जानेवारीमध्ये परिणाम होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑटो निर्माता कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवणाऱया निर्मात्यांना जागतिक स्तरावर चीपचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे याचा परिणाम उत्पादनांच्या निर्मितीवर जाणवतो आहे.

Related Stories

ऍमेझॉन इंडियाचा लहान लॉजिस्टीक व्यापाऱयांसाठी लवकरच विशेष कोष

Patil_p

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

इन्फोसिसचे 80 हजार कर्मचारी कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होममध्ये

Patil_p

मर्सिडीज बेंझची नवी स्पोर्टस् कार बाजारात

Patil_p

जीडीपी अंदाजामध्ये सुधारणा होण्याचे ‘फिच’चे संकेत

Patil_p

ई कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय 50 हजार कोटींवर

Patil_p
error: Content is protected !!