तरुण भारत

सेन्सेक्समध्ये घसरण -निफ्टी स्थिर

जागतिक बाजारात मिळता-जुळता कल : सेन्सेक्समध्ये 24.79 अंकांची घट

वृत्तसंस्था / मुंबई 

चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी जागतिक बाजारात मिळताजुळता कल राहिला होता. गुंतवणूकदारांनी नफा कमाई केल्याने भारतीय शेअर बाजारात चढउताराचा कल दिसून आला. सेन्सेक्समध्ये बुधवारी काही अंशांनी घसरण झाली. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र स्थिर राहिला आहे.

दिग्गज कंपन्यांमधील नफा कमाई झाल्याने दिवसअखेर बुधवारी सेन्सेक्सचा निर्देशांक 24.79 अंकांनी घसरुन 49,492.32 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1.40 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 14,564.85 वर नवा विक्रम प्राप्त करत स्थिरावला आहे. दुसऱया बाजूला निफ्टीने 14,653.35 चा उच्चांक प्राप्त केला होता.

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये सेन्सेक्समधील महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबत स्टेट बँक, आयटीसी, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि ओएनजीसी यांचे समभाग लाभामध्ये राहिले आहेत. दुसरीकडे बजाज फायनान्स, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, टायटन, सन फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.

देशातील बाजारामध्ये बुधवारी चढउताराचे वातावरण राहिले होते, यामुळे शेअर बाजार लाभ गमावत बंद झाला आहे. नफा कमाई सुरु राहिल्याने बाजार प्रभावीत झाल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

डिसेंबर 2020 मध्ये आर्थिक क्षेत्रात सुधारणा होत गेली आहे. अनेक कंपन्यांच्या तिमाही नफ्यातही सुधारणा झाल्या आहेत. यामुळे याचा बाजारात सकारात्मक कल राहिला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट तसेच हाँगकाँगचा हँगसेंगमध्ये घसरण राहिली आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे मात्र नफा कमाईत राहिले आहेत. प्रारंभीच्या काळात युरोपीय बाजार लाभात राहिले होते. याचरम्यान जागतिक बाजारातील बेंट कच्चे तेल 0.28 टक्क्यांनी वधारुन 56.74 प्रति डॉलरवर पोहोचले आहे.

Related Stories

ऍपलची स्मार्ट घडय़ाळे भारतात उपलब्ध

Patil_p

व्होडाफोन-आयडियाकडून 3,354 कोटी अदा

tarunbharat

युनिलिव्हरच्या उत्पादनांवर आता कार्बन उत्सर्जन लेबल

Patil_p

पेटीएमकडून 225 रुपयाच्या खरेदीवर कोरोना विमा संरक्षण

Patil_p

‘एलजी’कडून नवा प्रोजेक्टर लाँच

Omkar B

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला

Patil_p
error: Content is protected !!