तरुण भारत

ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेतील संशयितांकडून चोरीचे गुन्हे उघड

इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

इचलकरंजी / प्रतिनिधी

Advertisements

इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर राबविलेल्या ऑपरेशन ऑल आऊट मोहिम दरम्यान येथील शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉडवरील दोन गुन्हेगारांसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी असे 3 गुन्हे उघडकीस आणून, एक लॅपटॉप, एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. या पाच जणांमध्ये एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपाअधिक्षक बाबुराव महामुनी यांच्या सुचनेनुसार शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील आणि फरारी गुन्हेगारांच्या शोधासाठी मंगळवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट मोहिम राबवली. यामध्ये एका अल्पवयीन युवकासह दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याचे दोन साथिदार असा पाच जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील जवाहरनगरमध्ये एक घरफोडी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सागर टिपुगडे याला अटक करीत, त्यांच्या साथिदार अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे. कबनूर येथील लॅपटॉप चोरीप्रकरणी रजनेश सोनार याला अटक केली. तर कलानगर येथे मारहाण करून लुटणार्‍या आकाश माळी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार पांडुरंग सोनटक्के या दोघांना अटक केली. या मोहिमेत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्यासह 30 पोलीस कर्मचारी, 30 होमगार्ड यांचा समावेश होता.

Related Stories

कोल्हापूर जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद सभा दिवाळीनंतरच

Abhijeet Shinde

कोरोनानंतरच्या उपचारावर होणार जनजागृती

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अंबाबाईचा नवरात्रौत्सव भाविकांविनाच!

Abhijeet Shinde

अधिक नफ्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज – मा. आमदार चंद्रदीप नरके

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीत आत्मदहन केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठात नॅक’ समितीने साधला विविध घटकांशी संवाद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!