तरुण भारत

4 लक्षणांमुळे कळणार इम्युनिटीचा कालावधी

नवे संशोधन ः ज्वर, अतिसार, पोटदुखी ही लक्षणे असल्यास दीर्घकाळ सुरक्षा

कोरोनाचे संक्रमण झाल्यावर विशेष प्रकारची लक्षणे इम्युनिटी (रोगप्रतिकारकशक्ती) दीर्घकाळापर्यंत राहणार असल्याचे दर्शवितात. कोरोना संक्रमणादरम्यान पोटदुखी, अतिसार, भूक न लागणे आणि ज्वर ही लक्षणे दिसून आल्यास विषाणूच्या विरोधात इम्युनिटी म्हणजेच त्याच्याशी लढण्याची क्षमता दीर्घकाळापर्यंत राहत असल्याचा दावा अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठाने केला आहे.

113 रुग्णांवर संशोधन

विस्कॉन्सिन विद्यापीठाने यासंबंधीचे संशोधन 113 कोरोनाबाधितांवर केले आहे. हे रुग्ण 5 आठवडय़ांपर्यंत कोरोना संक्रमणाला सामोरे गेले होते. संक्रमणमुक्त झाल्यावर त्यांच्यावर संशोधन सुरू झाले. त्यांची रक्तचाचणी करण्यात आली. वैज्ञानिकांनुसार शरीरात अँटीबॉडीज अधिक निर्माण झाल्यावरही तीव्र ज्वर येऊ शकतो. हे लक्षणही दीर्घ इम्युनिटीचा संकेत देणारे आहे.

तीव्र ज्वर ः दीर्घकाळ इम्युनिटी

कोरोनाच्या संक्रमणाचे सर्वात सामान्य लक्षण ज्वर आहे. काही प्रकरणांमध्ये ज्वरासह खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. तीव्र ज्वर अधिक इम्युनिटी विकसित होण्याचा एक संकेतही असू शकतो, असे नवे संशोधनात दिसून आले आहे.

भूक न लागणे ः इम्युनिटी निर्माण होण्यास प्रारंभ

कोरोना विषाणू विविध रुग्णांमध्ये विविध प्रकारचे प्रभाव दाखवतो. अनेक लोकांमध्ये भूक न लागणे, गंध हरपणे यासारखी लक्षणे दिसून येतात, असे संशोधन अहवालात म्हटले गेले आहे. भूक न लागणे एक इन्फ्लेमेट्री रिस्पॉन्सप्रमाणे आहे. शरीरात विषाणूशी लढण्याची क्षमता निर्माण होण्यास सुरुवात झाल्यावर हे लक्षण दिसून येत असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

अतिसार ः सौम्य लक्षण, दीर्घ इम्युनिटी

कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये उलटी होण्याचेही लक्षण दिसून येते. यातून रुग्ण अतिसाराला तोंड देत असल्याचे समजते. ज्या रुग्णांमध्ये अतिसाराचा सौम्य त्रास होतो, त्यांच्यातही कोरोनाच्या विरोधात दीर्घकाळापर्यंत इम्युनिटी विकसित होते, असे संशोधनात आढळून आले आहे.

पोटदुखी ः अधिक अँटीबॉडीज

संशोधनानुसार संक्रमणादरम्यान पोटदुखी होत असल्यास संक्रमणमुक्त झाल्यावर इम्युनिटी दीर्घकाळापर्यंत राहणार असल्याचा तो संकेत असतो. अद्याप यासंबंधी विस्तृत संशोधन केले जाणार आहे. हे संशोधन कोरोनाची लक्षणे आणि इम्युनिटी यांच्यातील एक कनेक्शन असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

पुन्हा संक्रमणाचा धोका

काही लोक कोविड-19 पासून एकापेक्षा अधिकवेळा संक्रमित होऊ शकतात. अँटीबॉडीजचे प्रमाण आणि जन्मजात इम्युनिटीवर पुन्हा संक्रमण होण्याची जोखीम निर्भर असते. तसेच ज्या लोकांना अन्य आजार आहेत, त्यांना याची लागण होण्याची भीती अधिक असते. एखाद्या व्यक्तीला पुन्हा संक्रमण होण्याचा धोका किती आहे हे लक्षणे सांगत असल्याचे संशोधनानंतर म्हटले गेले आहे.

अँटीबॉडीजचा कालावधी

संक्रमणाशी लढण्याची कला शरीराने अवगत केल्यावर कोविड-19 विरोधात अँटीबॉडी विकसित होण्यास प्रारंभ होतो. विविध संशोधनांमध्ये एका व्यक्तीत अँटीबॉडी 3 ते 6 महिन्यापयंत राहू शकतात, त्यानंतर त्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून आले आहे. कोविड-19 ची लक्षणे नसलेले तसेच सौम्य असलेल्या लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत इम्युनिटी कमी असते.

Related Stories

दुसरी लाट तीव्र

Patil_p

नवीन नकाशाबाबत नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज मतदान

datta jadhav

युरोपमधील एकमेव हुकुमशहा संकटात

Patil_p

9.7 कोटी लोकसंख्या, शून्य कोरोनाबळी

Patil_p

हॉलिवूड लिजंड डग्लस कालवश

Patil_p

‘ट्रम्प हट्ट’: अमेरिकेची सुरक्षा धोक्यात

Omkar B
error: Content is protected !!