तरुण भारत

सॅन दियागोमध्ये अनेक गोरिल्ला कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेच्या सॅन दियागो येथील जू सफारी पार्कमधील अनेक गोरिल्ला कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या गोरिल्लांना खोकल्याचा त्रास सुरू झाल्यावर त्यांची कोरोना चाचणी करविण्यात आली होती. चाचणीत दोन गोरिल्ला कोरोनाबाधित आढळून आले होते. तर आता आणखी एका गोरिल्लातही कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत.  प्राणिसंग्रहालयात 8 गोरिल्ला एकत्र राहतात. यातील अनेकांमध्ये विषाणूचा प्रभाव असल्याचे मानले जात आहे. पार्कच्या वन्यजीव देखभाल पथकाच्या एका सदस्याद्वारे हे संक्रमण पोहोचले असावे. प्राणिसंग्रहालय सर्वसामान्यांसाठी 6 डिसेंबरपासून बंद करण्यात आले होते, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाच्या कार्यकारी संचालिका लिसा पीटरसन यांनी दिली आहे. पशूवैद्यकीय अधिकारी गोरिल्लांवर देखरेख ठेवून आहेत. बाधित गोरिल्लांना आता प्राणिसंग्रहालयातच ठेवण्यात येणार आहे. गोरिल्लांना सध्या व्हिटामिन, द्रवपदार्थ आणि भोजन दिले जात आहेत. गोरिल्लांना खोकला येत असला तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे लिसा यांनी सांगितले आहे.

Related Stories

दहशतवाद्यांसाठी मोबाईल टॉवर वाढवतोय पाकिस्तान

Patil_p

कोरोना महामारीत सुरक्षित राहण्याचा ‘फंडा’

Patil_p

ब्रिटनच्या संकरावताराला ‘अलग’ करण्यास यश

Patil_p

रशियात 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण

Patil_p

विमानात महिलेचा मृत्यू

Patil_p

सत्तांतर प्रक्रियेला ट्रम्प यांची परवानगी

datta jadhav
error: Content is protected !!