तरुण भारत

चिनी लस केवळ 50 टक्के प्रभावी

ब्राझीलच्या संशोधकांचा दावा ः चीनचा फुगा फुटणार

जगात कोरोना महामारीच्या विरोधात लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या लसींच्या प्रभावावर आता सर्वांची नजर लागून राहिली आहे. याचदरम्यान ब्राझीलने चीनच्या कोरोनावरील लसीसंबंधी मोठा दावा केला आहे. चीनची लस कोरोना विषाणूच्या विरोधात केवळ 50 टक्के प्रभावी असल्याचे ब्राझीलच्या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. ब्राझीलमध्ये चीनच्या सिनोवॅक बायोटेक लसीशी संबंधित एक आकडेवारी सादर करण्यात आली आहे. या नव्या आकडेवारीत लसीची प्रभावोत्पादकता केवळ 50.4 टक्के नमूद आहे. मागील आठवडय़ातच या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीशी संबंधित विदा प्रसिद्ध करण्यात आला होता. यात ही लस 75 टक्के प्रभावोत्पादक असल्याचा दावा करण्यात आला होता. चिनी लसीसंबंधी समोर आलेले नवे परिणाम ब्राझीलसाठी मोठी निराशा घेऊन आले आहेत. ब्राझील लसीकरणासाठी तयार असून त्याने चिनी लसीची निवड केली होती. चिनी लस अल्प प्रभावी असल्याने ब्राझीलला लसीकरणामागील उद्देश पूर्ण करता येणार नाही. सिनोवॅक लसीची ब्राझीलमधील भागीदार बुटानटन इन्स्टीटय़ूटने लसींच्या नव्या आकडेवारीवर लक्ष न देण्याचे आवाहन लोकांना केले आहे. ब्राझील आरोग्य नियामकासमोर या लसीची नवी आकडेवारी मांडण्यात आली असून यात त्याची प्रभावोत्पादकता 50.4 टक्के नमूद असल्याचे बुटानटन इन्स्टीटय़ूटने म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

अमेरिकेतील भारतीयांची भूमिका ठरणार महत्त्वाची

Patil_p

हिंसेच्या बळावर तालिबानला करू देणार नाही कब्जा

Patil_p

रशिया करणार अंतराळात चित्रीकरण

datta jadhav

आयसीयू कर्मचारीवर्ग तणावात

Patil_p

कोरोनामुळे लसीकरण मोहीम रेंगाळली

Patil_p

डेन्मार्कमध्ये मिळाली 3000 वर्षे जुनी कांस्य तलवार

Amit Kulkarni
error: Content is protected !!