तरुण भारत

जामताडाच्या ठकसेनांवर अमेरिकेचे संशोधन

भल्याभल्यांना लिलया फसविण्याची करामत : सायबर गुन्हय़ांसाठी देशभरात कुप्रसिद्ध ः बेन मॅपिंग करण्यात येणार

वृत्तसंस्था/ रांची

‘तुम इतने पैसे कमाकर क्या करोगे’ ‘जामताडा का सबसे अमीर आदमी बनेंगे’ हा डायलॉग नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय वेबसीरिज जामताडाचा आहे. या वेबसीरिजची टॅगलाईन ‘सबका नंबर आएगा’ अशी होती.   एखादा ठकसेन तुम्हाला एटीएम बंद झाल्याचे तसेच लॉटरी लागल्याच्या नावावर सायबर फ्रॉड करून बँक खात्यातील रक्कम काढून घेत फसवणुकीचा हा नंबर येणार असे यात अभिप्रेत होते. याच कारणामुळे जामताडा देशभरात सायबर गुन्हय़ांसाठी कुप्रसिद्ध ठरले आहे. देशातील बहुतांश सायबर फसवणुकीची प्रकरणे झारखंडच्या याच जिल्हय़ाशी संबंधित असतात. 

जामताडाच्या लोकांच्या या कृत्यांमुळे त्यांना अमेरिकेपर्यंतही ओळख मिळवून दिली आहे. जामताडाचे हे अवैध धंदे आणि यात सामील लोकांवर अमेरिकेची एक यंत्रणा आता अध्ययन करणार आहे. या भागातील अत्यंत कमी शिक्षित युवक कशाप्रकारे लोकांची फसवणूक करतात यावर हे संशोधन होणार आहे. तसेच या  युवकांना तंत्रज्ञानाची इतकी सखोल माहिती कशी मिळते, ज्याद्वारे ते कुणाचेही अकौंट हॅक करतात हेही शोधले जाणार आहे.

अमेरिकन यंत्रणा जामताडा येथे पोहोचून तेथे कमी शिकलेल्या युवकांचे बेन मॅपिंग करणार आहे. अखेर कशाप्रकारे अत्यंत कमी शिकूनही येथील ठकसेनांनी माहिती-तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जामताडामध्ये संशोधनापूर्वी अमेरिकेच्या यंत्रणेने दिल्लीत पोलीस महासंचालक स्तरीय अधिकाऱयासोबत बैठक घेतली आहे.

व्यर्थ अभिमान

जामताडामधील सायबर ठकसेनांवर होणाऱया संशोधनाला तेथील लोक अभिमानाची बाब मानत आहेत. अमेरिकेसारखा देश यावर संशोधन करत असल्यास जामताडासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे विधान तेथील प्राध्यापक टी.के. माझी यांनी केले आहे. सायबर गुन्हय़ांना कुठल्याचप्रकारे योग्य ठरविले जाऊ शकत नाही. या तरुणांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर देशहिताकरता सरकारने करावा असेही त्यांनी म्हटले.

शेकडो जणांवर गुन्हे

जामताडामध्ये प्रतिदिन एखाद्या राज्याचे पोलीस तपासासाठी पोहोचलेले असतात. हे देशातील सायबर गुन्हय़ांचे सर्वात मोठे केंद्र ठरले आहे. एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान 12 राज्यांच्या पोलिसांनी 23 वेळा या जिल्हय़ाचा दौरा केला आहे. तसेच विविध प्रकरणांमध्ये सुमारे 38 आरोपींना अटक केली आहे.  जामताडा जिल्हा पोलिसांकडून जुलै 2014 ते जुलै 2017 दरम्यान 330 जणांच्या विरोधात 80 पेक्षा अधिक सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदविले आहेत. केवळ करमातर पोलीस स्थानकात 2017 मध्ये फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 100 हून अधिक जणांना अटक झाली होती.

Related Stories

भारताच्या प्रत्युत्तराने POK चे मोठे नुकसान; नेत्यांची कबुली

datta jadhav

ब्राझीलमध्ये 8.5 लाखाहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

दाऊद इब्राहिमसह 21 दहशतवाद्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक

Patil_p

अमेरिकेचे विदेश मंत्री 7 देशांच्या दौऱयावर

Omkar B

कोरोना संकटामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात

Patil_p

‘टिकटॉक’चे मुख्यालय लंडनला हलविण्याचा कंपनीचा विचार

datta jadhav
error: Content is protected !!