उणे 20 अंशांवर पोहोचला पारा
सोल
दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधून वाहणारी हान नदी गोठली आहे. दक्षिण कोरियात यंदा विक्रमी थंडी दिसून येत आहे. शहरातील किमान तापमान उणे 20 अंशापर्यंत खालावले आहे. मागील दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच हान नदीचे पात्र गोठले आहे. मागील 30 वर्षांची सरासरी पाहिल्यास हान नदी यंदा 4 दिवस अगोदरच गोठली आहे. सर्वसाधारपणे या काळात दक्षिण कोरियातील तापमान उणे 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहते. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत अशाचप्रकारे हवामान राहण्याचा अनुमान व्यक्त केला आहे. सोशलमध्ये गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 5 अन्य विमानतळांनी 23 विमानोड्डाणे रद्द केली आहेत. तर 36 मार्गांवर वाहतूकसेवा रोखण्यात आली आहे. 1906 पासून हान नदी गोठू लागली आहे .तर बुसान शहरात यंदा दशकातील सर्वात कडाक्याची थंडी पडू लागली आहे.