तरुण भारत

66 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

प्रचाराची सांगता : बहुतांश ठिकाणी दुरंगी लढती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात 70 पैकी चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 66 ग्रामपंचायतींच्या 494 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारी रोजी होत आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपने प्रति÷sची केल्याने चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले आहे.

66 ग्रामपंचायतींसाठी 1 लाख 9 हजार 162 मतदार निश्चित झाले आहेत. यात महिला मतदार 54 हजार 59, तर पुरुष मतदार 55 हजार 103 एवढे आहेत. 70 ग्रामपंचायतींमधील एकूण 600 जागांपैकी 106 सदस्य जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक जाहीर प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या.

70 ग्रामपंचायतींच्या 600 जागांसाठी 1550 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 15 बाद झाले होते. राहिलेल्या 1535 पैकी 342 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 1087 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 600 पैकी 106 जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता 494 जागांसाठी प्रत्यक्षात 1087 उमेदवार रिंगणात आहेत. 1087 उमेदवार 226 प्रभागात राजकीय नशीब आजमावत आहेत. येथे अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यातील अनेक ठिकाणी एकास एक या प्रमाणे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे.

देवगड तालुक्मयातील 23 पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 21 ग्रामपंचायतींच्या 189 जागांसाठी 307 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडी तालुक्मयातील 11 ग्रा. पं. च्या 119 जागांसाठी 265 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. वैभववाडी तालुक्मयातील 13 ग्रा. पं. पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध झाली आहे. त्यामुळे 12 ग्रा. पं. च्या 103 जागांसाठी 142 उमेदवार रिंगणात आहेत. मालवण तालुक्मयातील सहा ग्रा. पं. च्या 54 जागांसाठी 105 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. कुडाळ तालुक्मयातील नऊ ग्रा. पं. च्या 71 जागांसाठी 105 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कणकवली तालुक्मयातील तीनपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने दोन ग्रा. पं. च्या 14 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. वेंगुर्ले तालुक्मयातील दोन ग्रा. पं. च्या 18 जागांसाठी 49 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दोडामार्ग तालुक्मयातील तीन ग्रा. पं. च्या 25 जागांसाठी 34 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 494 जागांसाठी 1087 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

चार ग्रामपंचायती बिनविरोध

106 जागांसह चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वाधिक देवगड तालुक्यात दोन तसेच वैभववाडी तालुक्मयात एक व कणकवली तालुक्मयातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर 106 सदस्यांमध्ये देवगड 42, वैभववाडी 37, मालवण चार, कुडाळ चार, कणकवली 11, तर दोडामार्ग तालुक्मयातील आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

सकाळी 7.30 पासून मतदानाला प्रारंभ

15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान मुदत आहे. निवडणूक अनुषंगाने नियुक्त कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच 295 मतदान यंत्रांचे वाटप आठही तालुक्मयात करण्यात आले आहे. यात वैभववाडी 40, कुडाळ 40, सावंतवाडी 70, मालवण 30, देवगड 80, दोडामार्ग 15, वेंगुर्ले 10 व कणकवली 10 अशाप्रकारे मतदान यंत्रांचा समावेश आहे.

Related Stories

कोरोना प्रयोग शाळेला तब्बल 3 महिन्यांचा विलंब

Patil_p

जिल्हय़ात कोरोनाची संख्या साडेतीनशे पार

Patil_p

क्वारटाईन असणाऱया व्यक्तीवर गुन्हा

Patil_p

ग्रामपंचायत विभागाचा कारभार ‘इकडून-तिकडून’

Patil_p

दापोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने प्रशासनाची धावपळ

triratna

लंडनमधील ‘कोरोना लढाई’त सिंधुकन्या ‘टीम लिडर’

NIKHIL_N
error: Content is protected !!