तरुण भारत

देशव्यापी लसीकरणाचे शनिवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 जानेवारी, अर्थात येत्या शनिवारी देशव्यापी कोरोना लसीकरण उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यासमवेत ‘को-विन’ या ऍपचेही राष्ट्रार्पण केले जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

लसीकरणासाठी भारताने भारतनिर्मित कोव्हॅक्सिन आणि सिरम कंपनी उत्पादित कोव्हीशिल्ड या दोन लसींना मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असून कोरोनाविरोधात त्यांचा प्रयोग यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरण उपक्रमाच्या प्रारंभीच्या टप्प्यात देशातील तीन कोटी कोरोना योद्धे आणि आरोग्य कर्मचारी तसेच इतरांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरीकांचे लसीकरण करण्यात येईल.

दुसऱया टप्प्यात पन्नास वर्षे वयाचे पुढचे नागरीक आणि ज्या नागरीकांना इतर दुर्धर व्याधी आहेत, असे पन्नाशीच्या आतले नागरीक यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यांची संख्या साधारणतः 27 कोटी आहे. अशा प्रकारे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 30 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल.

लसी प्रभावी, सुरक्षित 

देशव्यापी लसीकरणाचा निर्णय व्यापक आढाव्यानंतर घेण्यात आला. पंतप्रधान मादी यांनी देशातील कोरोना परिस्थिती तज्ञांकडून आणि विविध सरकारी विभागांकडून जाणून घेतली. त्यानंतर लसींची स्थिती आणि त्यांची परिणामकारतता व सुरक्षा यांचा विचार करण्यात आला. त्यानंतरच लसीकरण कार्यक्रम निश्चित करण्यात आला. नागरीकांनी लसीसंदर्भात निश्चिंत असावे असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. लसीकरणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.

16 जानेवारी का ?

देशव्यापी लसीकरणाच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी केंद्र सरकारने 16 जानेवारी हा दिवस निवडला याचेही महत्वाचे कारण आहे. 16 जानेवारीपर्यंत लोहरी, मकर सक्रांती, पोंगल, माघ बिहू इत्यादी सर्व सण होऊन गेलेले असतात. त्यामुळे या दिवसापासून सलगपणे देशाच्या सर्व भागांमध्ये लसीकरण करता येईल, अशा विचाराने हा दिवस निवडला असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

जगभरातील 74 हजार कोरोना संक्रमित झाले ठणठणीत बरे

tarunbharat

15 रोजी संपणार टाळेबंदी : मुख्यमंत्री योगी

Patil_p

विनाकारण भटकणाऱयांना सचिनचा घरी बसण्याचा सल्ला

tarunbharat

दिल्लीत दिवसभरात 1404 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

pradnya p

अनंतनागमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

दिल्लीत गेल्या 24 तासात 340 नवे कोरोना रुग्ण; 04 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!