तरुण भारत

भारतीय मुष्टियोद्धय़ांसाठी यंदा भरगच्च हंगाम

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

कोव्हिड-19 मुळे मोठा ब्रेक घ्यावा लागल्यानंतर भारतीय मुष्टियोद्धे आता पुढील काही महिन्यात विशेषतः युरोपमध्ये होणाऱया लागोपाठ स्पर्धांसाठी सज्ज होत आहेत. बल्गेरियातील प्रतिष्ठेच्या स्ट्रन्जा स्मृती स्पर्धेच्या माध्यमातून नव्या हंगामाला सुरुवात होईल. भारतीय मुष्टियुद्ध संघटनेचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सॅन्तियागो निएव्हा यांनी भरगच्च हंगाम असला तरी ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचे यावेळी नमूद केले.

बल्गेरियातील स्टॅन्जा स्मृती चषक स्पर्धेचे यंदा 72 वे वर्ष आहे. यंदाची आवृत्ती दि. 21 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत सोफियात होईल. अमित पांघल (52 किलोग्रॅम), मनीष कौशिक (63 कि.), विकास कृष्णन (69 कि.), आशिष कुमार (75 कि.), सतीश कुमार (91 किलोवरील), एमसी मेरी कोम (51 कि.), सिमरनजीत कौर (60 कि.), लवलिना बोर्घोहेन (69 कि.), पूजा राणी (75 कि.) हे 9 मुष्टियोद्धे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

विश्व पात्रता फेरीच्या माध्यमातून ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित करण्याची संधी उर्वरित मुष्टियोद्धय़ांना मिळणार आहे. यंदाची ऑलिम्पिक जुलै-ऑगस्टमध्ये खेळवली जाणार आहे. सध्या सर्व मुष्टियोद्धे बळ्ळारीतील इन्स्पायर इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस् सेंटरमध्ये आहेत. जेएसडब्ल्यू स्पोर्टर्सने स्थापलेल्या या सेंटरच्या कार्यकारिणीवर ऑलिम्पिक सुवर्णजेता अभिनव बिंद्रा व माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली यांचा समावेश आहे.

Related Stories

फुटबॉलपटू फेलानीची रूग्णालयातून सुटका

Patil_p

रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱयातून बाहेर

Patil_p

सिरिएलोकडून विश्लेषण प्रशिक्षकपदाचा त्याग

Patil_p

क्रिकेट अफगाणच्या सीईओपदी कुरेशी

Patil_p

‘यॉर्कर’ने अठराविश्वे दारिद्रय़ाची शकले पाडणारा टी. नटराजन

Omkar B

नादाल पराभूत, जोकोव्हिच विजयी

Patil_p
error: Content is protected !!