बेळगाव : येथील प्रजापिता ब्रम्हाकमारी विश्व विद्यालय व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात आला. यावेळी बेळगाव, विजापूर, बागलकोट येथील पॉलिटेक्निक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय. एम. दोडमनी होते. संचालिका बी. के. अंबिका यांनी उद्घाटन करून युवक दिनाविषयी मनोगत क्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जी. बी. दानशेट्टी, बनशंकरम्मा यांनी भाषणातून स्वामी विवेकानंदाचा जीवनप्रवास उलघडला. यावेळी प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या प्राचार्या बी. के. रूपा, विजापूरच्या बी. के. शैला, प्रा. उषा मिरजकर, प्रा. सविता शिंदे, प्रा. मेघना राणी, प्रविण नायक, बी. के. नागरत्ना, बी. के. अर्जित आदी उपस्थित होते.


previous post
next post