बेळगाव : ज्योती सेंट्रल स्कूलच्या माजी प्राचार्या व व्यवस्थापिका सोनल सौदागर यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन डॉ. पी. डी. काळे, सुभाष ओऊळकर, डॉ. दीपक देसाई, विक्रम पाटील, ऍड. आनंद पाटील, आर. एस. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचे स्वागत निशा भोसले यांनी केले. सोनल सौदागर यांचा परिचय सविता मुन्नोळकर यांनी करून दिला. तसेच स्मिता कलघटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष ओऊळकर, विक्रम पाटील व डॉ. पी. डी. काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे चेअरमन डॉ. काळे यांनी मॅडमच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेतला. शाळेचा मुख्य पाया म्हणजे मॅडम आहेत. शाळेसाठी त्यांनी खूप काही केले आह। असे ते म्हणाले. विद्यार्थिनी एस. दिव्या हिने आपले मनोगत व्यक्त केले. अनिता भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


previous post