तरुण भारत

नरेगातून अलतगा येथे 14 लाखांच्या कामांना प्रारंभ

सहा टप्प्यात होणार कामे, नागरिकांतून समाधान

बेळगाव : अलतगा (ता. खानापूर) येथे उद्योग खात्रीतून विविध विकास कामांना चालना देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सुमारे 14 लाखांच्या विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांच्या उपस्थितीत या कामांचा शुभारंभ करण्यात आला असून एकूण सहा टप्प्यात ही कामे होणार आहेत. अलतगा येथे रेणुका मेत्री यांच्या शेतापासून ते मोनाप्पा पाटील यांच्या शेतवडीपर्यंत दीड कि.मी. नाला खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 4 लाख 90 हजार खर्च होणार असून एकूण सहा टप्प्यात 14 लाखापर्यंत अनुदान खर्च होणार आहे. नवनिर्वाचित सदस्य चेतक कांबळे, गिरीजा सुतार, विनोद शिंदे, दुंडव्वा माळगी, लक्ष्मण पावशे, पुंडलिक पाटील, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, बाळू चौगुले, एसडीएमसी अध्यक्ष बाळू हिरोजी, मोहन पाटील, पीडीओ आर. एम. फगरे, प्रशांत माळगी यांच्यासह ग्रामस्थ व जॉबकार्डधारक कामगार उपस्थित होते. कामे सुरू केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

गोकाकमध्ये पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला प्रियकरासह अटक

Patil_p

सारस्वत वधूवर मंडळ, बेळगावतर्फे वधू वर मेळावा

Omkar B

माळी गल्ली येथे दोघा मटकाबुकींना अटक

Rohan_P

निवेदिता यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारत सुरक्षित ठेऊया

Patil_p

बुदलमुख येथे शेतीकामासाठी लगबग

Patil_p

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यावर कार्यशाळा

Rohan_P
error: Content is protected !!