तरुण भारत

अन् प्रचाराच्या तोफा थंडावल्या

प्रतिनिधी/ सातारा

  सध्या ग्राम पंचायत निवडणुकीच्या तोफा थंडावल्या असुन ग्रामीण भागात विविध विषयांच्या चर्चांना उत आलाय. निवडणूक होण्याआधीच काही हौसी-नौसी कोणाला किती मते पडणार, कोण जिंकनार कोण हरणार याचा अंदान मतदान होणापुर्वीच लावताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील ग्रामीण भागातील वातावण निवडणुकीच्या रंगात चांगलेच रंगलेले दिसत आहे.

Advertisements

 ग्राम पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरून निवडणूकीच्या रणांगणात उतरले. मतदात्यांना आकर्षीत करण्यासाठी विविध फंडे आजमावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे मांवसाहारी जेवणावळींवर अधिक भर होता. आता निवडणूकेच्या तोफा थंडावल्या जरी असल्या तरी छुप्या पध्दतीने प्रचार करण्यात येत आहे. कित्तेक गावामध्ये तरी विविध संस्था, दुध संघ व भाकवकी च्या माध्यमातुन पॅनल उभे करून निवडणूका लढविण्यात येत आहेत.

 त्यामुळे आता कोणत्या भागात किती टक्के मतदान होणार व कोणाला किती मते पडणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागुण राहिले आहे. त्यामुळे निवडणूकीत उभारलेल्या कित्तेक उमेदवारांच्या छातीची धडधड ही वाढलेली आहे. यंदा निवडणुकींसाठी उभारलेल्या महिलांची संख्या ही अधिक आहे.

 गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचे संकट असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका सुरळीतपणे पार पडल्यानंतर. ग्राम पंचायती निवडणूक जाहिर करण्यात आले. यामध्ये निवडणूकीची नोटीस 15 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर, उमेदवारी अर्जांची छाननी दे. 31 डिसेंबर, उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप दि. 4 जानेवारी रोजी करण्यात आले. आता मतदान दि. 15 जानेवारी (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30), मतमोजनी दि. 18 जानेवारी व निवडणुक निकालाची अधिसुचना दि. 21 जानेवारी रोजी प्रसिध्द होणार आहे.

 सजन हंकारे (तालुका पी.आय)

कोणतेही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी प्रशासन सज्ज असुन प्रत्येक गावांमध्ये याबाबत बैठकीही घेण्यात आल्या. त्याचबरोबर कोंडवे, सौदापूर, कन्हेर, गोवे, तासगाव आदी गावांमधुन पोलिसांचे रूट मार्च देखिल घेण्यात आले. नुकतेच नेले येथे चिकन वाटप करणाऱया दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे प्रकार पुन्हा उघडकीस आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

Related Stories

सांगली : शांतिनिकेतन अभ्यास केंद्राच्या दोन विद्यार्थीनी महाराष्ट्रात द्वितीय

triratna

फाशीचा वड स्मारकास विद्रोहींकडून अभिवादन

datta jadhav

रॉबिनहूड आर्मी समाजसेवकांकडून परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मदत

triratna

कराचीत होणार ऑनलाईन शिवजयंती

Patil_p

कोडोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; सर्वत्र खळबळ

triratna

ऑनलाइन गीत वाचन स्पर्धेत गजानन वाईकर सातारा जिल्ह्यात प्रथम

triratna
error: Content is protected !!