तरुण भारत

थेट ऍक्शन मोडवर टिम गुन्हे प्रकटीकरण

2020 मध्ये 157 गुन्हे उघड आणि 1 कोटी 19 लाख 85 हजारांचा मुद्देमाल ताब्यात 

गोडोली / विजय जाधव

Advertisements

 गुन्हा घडला की तो तत्काळ उघड करण्यात शहर पोलीसांची गुन्हे प्रकटीकरण टिम यशस्वी होत असल्याने गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. 2020 मध्ये तब्बल 157 गुन्हे उघड करून 1 कोटी 19 लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातारा शहर पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण टिमने गतवर्षांत दमदार कामगिरी केली आहे. कोणाच्या ही दबावाचे टेंश्नन न घेता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फक्त ऍक्शन करण्यात ही टिम सक्षमपणे वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत गुन्हांचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी झाली आहे. आता साताऱयात गुन्हेगारी वर्तुळात गुन्हा करण्यापुर्वी गुन्हे प्रकटीकरण टिमची भिती वाटू लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

     सातारा शहरात गेल्या वर्षभरात घडलेले गुन्हे उघडकीस येण्याचा प्रमाण सर्वोत्तम राखण्यात शहर गुन्हे प्रकटीकरणची टीम यशस्वी झाली आहे. गुन्हा घडल्यावर तत्काळ तपास करण्यामागे या टीमचा जबरदस्त नेटवर्क आणि गुन्हेगारांच्यावर असलेला वचक महत्वाचा ठरत आहे. कार्यक्षेत्रातील खुन, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, पळवा पळवी सारख्या गुन्हाचा यशस्वी तपास आणि गुन्हेगारांच्या योग्य शिक्षा होण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा फास आवळण्यात ही टीम आघाडीवर असून सध्या जिल्हयात चर्चेत आली आहे.  

    सातारा शहर संवेदनशिल असल्याने सहसा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षक पदावर काम करण्यासाठी अधिकारी इच्छुक नसतात.डिसेंबर 2019 मध्ये शहर पोलीस स्टेशनचा चार्ज आण्णासाहेब मांजरे यांनी घेतला.त्यांची गडचिरोली,मुंबई सारख्या शहरात डिटेक्शन अधिकारी म्हणून उत्तम काम,तसेच अनेक ठिकाणी दमदार कामगिरी असून साताऱयाचा परिचय कमी असताना कर्मचाऱयांच्या मध्ये ऊर्जा निर्माण करत मोर्चे,आंदोलने,कोरोना काळात ही कधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. तर गुन्हे प्रकटीकरण विभागाची जेव्हा पोलीस उप निरिक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली पुर्णपणे नवख्या आठ कर्मचाऱयांची टीम दिली तेव्हा हास्यास्पद टिपणी करणारे आता त्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना दिसतात. नानासाहेब कदम मुळचे सोलापूर जिल्हयातील,ते थेट गडचिरोलीत उल्लेखनिय कामगिरी करून साताऱयात आले. त्यांनी काही महिने बोरगाव,एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये काम केले. सातारा शहराचा म्हणावा तसा अभ्यास नसताना शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे प्रकटीकरण विभागाची जबाबदारी सोपवली. त्यात आठ ही तरूण कर्मचाऱयांची टीममध्ये नेमणूक झाल्यावर जुन्या कर्मचारी आणि गुन्हेगार विश्वातील अनेकांना ही टिमबद्दल टिकात्मक टिपणीची चर्चा त्यावेळी ऐकायला मिळाली होती.  

    सध्या हीच टिम प्रत्येक गुन्हयाचा तपास कमी वेळेत करण्यात माहिर झाली आहे. 2020 मधील त्यांच्या कामगिरीचा अहवाल पाहता,गुन्हे उघड करण्यात कौतुकास्पद कामगिरी केल्याचे समोर आले आहे. दि.29 जानेवारी रोजी क्षेत्र माहुली येथे अभिजित मोहिरेच्या खुनी असलेल्या अज्ञात मारेकऱयाला काही तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात ही टिम यशस्वी झाली. नामांकित कणसे होंडा शोरूममधील तब्बल 37 मोटार सायकली चोरून परस्पर विक्री करून परागंदा झालेल्या शशिकांत चांगदेव नलवडे यांला थेट गोवा आणि कोल्हापूर जिल्हयातून कसून शोध घेत आरोपीला ताब्यात घेतले.सर्व 37 विक्री केलेल्या 19 लाख 11 हजार 608 किंमतीच्या मोटार सायकली हस्तगत करण्यात हीच टीम अवघ्या काही दिवसात यशस्वी झाली.  

           कोडोलीतील दत्तनगर येथील ज्योती नलावडे यांच्या बंद घराची फोडी करणारे अज्ञात चार आरापींना काही तासात ताब्यात घेऊन चोरीला गेलेला 3 लाख 27 हजारांचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी याच टिमने दोन दिवसात करून दाखवली. दि.23 फेब्रुवारी रोजी राधिका रोडवर खिशातील 10 हजार रोकड आणि किंमती मोबाईल चोरणाऱया तीन अज्ञात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. दि.1 जून रोजीचा सातारा तालुक्यातील देगाव येथील अज्ञात युवकाचा अज्ञात आरोपींनी केलेला खुन अवघ्या काही दिवसात उघड केला.घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना  झारखंड राज्यात पळून जाणाऱया दोन आरोपींना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणण्यात या टिमने बाजी मारली. 

       दि.24 सप्टेंबर रोजी केसरकर पेठेत बिल्लपल्ली यांच्या घरात कोरोना आजाराचा सर्व्हे करण्याचा बहाना करून टाकलेल्या पुण्याच्या पाच आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल 80 हजारांचे सोने,गुन्हयात वापरलेली तब्बल 7 लाख किंमतीचे वाहने जप्त करत या टिमची कामगिरी उंचावली. अशाच प्रकारचा जिल्हा परिषद चौकात ओमणी गाडीतून येवून एकाची गाडी फोडून दरोडा टाकणाऱया अज्ञात आरोपींना दोन दिवसात ताब्यात घेतले.याच गुन्हयातील कोयता गँगच्या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळून चोरलेली 30 हजाराची सोन्याची चेन आणि गुन्हयात वापरलेली हत्यारे, वाहन जप्त करण्याची कामगिरी या टिम केली. 

   दि.29 सप्टेंबर रोजी लोणंदपोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळज येथील बालकाची अज्ञाताने केलेल्या हत्येचे गुढ उकलण्यात यश येत नव्हते.तेव्हा सातारच्या याच टिमला वरिष्ठांनी विश्वासाने पाचारण केले आणि काही तासात सपोनि नानासाहेब कदम आणि टिमने डमडाटा आणि सीडीआर ऍनॅलिसीसव्दारे हा गुन्हा उघड करत आरोपी कडून गुन्हा कबूल करून घेत गुन्हा उघड केला. दि.15 डिसेंबर रोजी समर्थ मंदिर परिसरातील बजरंग गावडे यांच्या अज्ञात खुन्यांना काही तासात बेडया घालण्यात ही टिम यशस्वी झाली.अशा अनेक गुन्हयांचा तत्काळ तपास करण्यात माहीर झालेल्या या टीमने वर्षभरात कौतुकास्पद कामगिरी करून दाखवली आहे.

    सध्या साताऱयातील गुन्हेगारांच्यावर शहर पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण टिमचा चांगलाच वचक बसला आहे. गुन्हा घडला ही काही तासात गुन्हा उघड करण्यात हीच टिम यशस्वी होत असल्याने पोली निरिक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक नानासाहेब कदम यांनी नवख्या कर्मचाऱयांना सोबत घेत 2020 मध्ये उल्लेखनिक कामगिरी करत गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात यश प्राप्त केलेले दिसते. 

Related Stories

उद्योगपती मित्रांसाठी देश काढला विक्रीस

Patil_p

राजेंनी ओपन गाडीतून मारली रपेट

Patil_p

पोलिस प्रशासनाला शिक्षकांचे पाठबळ

Patil_p

मास असोसिएशनकडून कैलास स्मशानभूमीस दोन अग्निकुंड भेट

Patil_p

राज्यातील ‘हे’ १८ जिल्ह्ये पूर्णपणे अनलॉक- विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

सातारा : सदर बाजारात आढळला मृत बगळा

datta jadhav
error: Content is protected !!