तरुण भारत

जाहीर प्रचार थंडावला…

उद्या जिह्यात 360 ग्रा.पं.साठी होणार मतदान

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या जाहीर तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या असून, उद्या 15 जानेवारी रोजी होणाऱया मतदानाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. या दिवशी जिह्यात 360 ग्रामपंचायतींसाठी होणाऱया मतदानातून 4,338 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानादिवशी ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाने राजकीय वातावरण  ढवळून निघाले आहे.  प्रचारासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून आपापल्यापरिने जाहीर प्रचाराच्या तोफा धडधडत हेत्या. मात्र हा जाहीर प्रचार बुधवारी सायंकाळी 5 वाजता बंद झाला. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आता आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शुक्रवारी सकाळपर्यंत छुप्या प्रचाराच्या उलथापालथींना जोर चढणार आहे. त्यावर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. निवडणूक होणाऱया ज्या ग्रामपंचायतीच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती तसेच महानगरपालिकेसारख्या मोठय़ा नागरी वसाहती वसल्या आहेत, अशा ठिकाणी नोकरीनिमित्ताने कामास येणाऱया संबंधित ग्रामपंचायतीमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यादृष्टीने अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी/विशेष सवलत देण्यात यावी, शहरी भागात किंवा निवडणुका नसलेल्या भागातील दुकाने/कंपन्या/वाणिज्यीक आस्थापना बंद ठेवण्याची गरज नाही. या आदेशाचे दुकान, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम धारकांनी काटेकोरपणे पालन करावे, या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Related Stories

जिल्हा विशेष कारागृहातील 13 कैद्यांना पॅरोल

tarunbharat

संकटकाळात तरी जबाबदारीने वागा

NIKHIL_N

जिल्हय़ात आणखी 101 पॉझिटिव्ह

Patil_p

गुन्हे दाखल झाल्यास पर्वा नाही

NIKHIL_N

जिल्हय़ात कोरोनाचा व्याप, त्यात ‘सारी’चा ताप

Patil_p

मोचेमाड घाटमार्गावर आढळल्या नोटा

NIKHIL_N
error: Content is protected !!