पहिल्या लसीकरणासाठी 16,330 डोस उपलब्ध
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सर्वांनाच संकटात टाकलेल्या कोरोना महामारीवर लस कधी उपलब्ध होणार, याची प्रतीक्षा आता संपली आहे. 16 जानेवारीला होणाऱया लसीकरणाची जिल्हय़ातील आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. प्रारंभाच्या टप्प्यातील लसीकरणासाठी जिल्हय़ासाठी 16 हजार 330 कोरोना लसीचे डोस बुधवारी रात्रीच उपलब्ध झाले आहेत. या लसीचे वितरण 14 जानेवारी रोजी जिल्हय़ात निवडलेल्या केंद्रावर केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
ही लस पुण्यातून कोल्हापूरमध्ये प्रथम दाखल झाली. त्यानंतर रत्नागिरी आरोग्य विभागाचे कर्मचारी एस. आर. साळवी आणि त्यांचे सहकारी पी. पी. साळवी यांनी ही लस कोल्हापूर येथे सायंकाळी 5 च्या सुमारास ताब्यात घेतली. ही लस बुधवारी रात्री व्हॅक्सिन व्हॅनव्दारे रत्नागिरीत दाखल झाली.
कोरोनावरील सिरम इन्स्टिटय़ुट व भारत बायोटेक यांच्या लसींना ड्रग्ज कन्ट्रोलर ऑफ इंडियाने नुकतीच मान्यता दिल्यानंतर कोरोना लसीकरणासाठी सर्वत्र तयारी सुरू करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत़ जिह्यात शुक्रवारी 8 जानेवारी रोजी जिल्हा शासकीय रूग्णालय, दापोली उपजिल्हा रूग्णालय व हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीपणे पार पडली होती.
असे होईल लसीकरण
लसीकरणासाठी निवडणूक मतदान प्रक्रियेप्रमाणे तयारी करण्यात आली आह़े प्रत्यक्ष लस देण्यासाठी 5 जणांची टीम असून त्यामध्ये 1 प्रशिक्षित कर्मचारी प्रत्यक्ष लस देणार आहे तर उर्वरित त्याला सहाय्य करणार आहेत़ लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनाच ही लस देण्यात येणार आह़े नाव नोंदवण्यात आलेल्या व्यक्तीच्या मोबाईवर एक संदेश (एसएमएस) पाठवण्यात येईल़ या संदेशाची खातरजमा करून त्याला लसीकरणासाठी कक्षामध्ये पाठविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणानंतर लाभार्थ्याला अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आह़े त्यानंतर त्या व्यक्तीला काही त्रास जाणवल्यास उपचारासाठी तातडीच्या उपचारांचीही सोय करण्यात आली आह़े लसीकरणानंतर त्या व्यक्तीचे नाव कोवीन या ऍपवर अपलोड हेणार आह़े
पहिली लस कोणाला?
पहिल्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाईन वर्कर असलेल्या जिह्यातील खासगी व सरकारी क्षेत्रातील 14 हजार आरोग्य कर्मचाऱयांना ही लस मोफत देण्यात येणार आह़े त्यानंतर 50 वर्षावरील नागरिकांना लसीकरण हेईल़ त्यामध्ये आजार असलेल्या नागरिकांचा प्राधान्य देण्यात येणार आह़े
एका दिवसात 100 जणांना डोस
जिह्यात सुरूवातीला एका दिवसांत 100 जणांना लसीकरण करण्याची तयारी करण्यात आली आह़े गरजेनुसार त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासन स्तरावरून सांगण्यात आले.
कोरोना लसीकरणासाठी †िजह्यात 6 केंद्रे
जिह्यात कोरोना लसीकरणासाठी 6 केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालय, चिपळूण कामथे रुग्णालय, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय, राजापूर ग्रामीण रुग्णालयांचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले.