तरुण भारत

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासाठी घोगळ मंदिरात महामृत्युंजय जप

प्रतिनिधी/ फातोर्डा

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना अपघात होऊन त्यात ते जखमी झाल्याने त्यांच्या तब्येतीची सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी घोगळ येथील संकट भंजन हनुमान मंदिरामध्ये भास्कर भट आणि ?ईश्वर भट यांच्या पौरोहित्याखाली होमकुंड प्रज्वलित करून तसेच दुर्गादास प्रभू आणि नीळकंठ नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाविकांनी सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत अखंड महामृत्युंजय जप केला. यामध्ये संदीप नाईक, वल्लभदास रायकर, वविता रायकर व इतर मिळून 20 पेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे आजारी असताना अशाच प्रकारचा महामृत्युंजय जप या ठिकाणी करण्यात आला होता, अशी माहिती प्रभू यांनी दिली.

Related Stories

दुकानदारांना अध्यादेश जारीकरण्यापेक्षा विधानसभेत खुलेआम चर्चा करा-

Patil_p

पोस्टर पेंटींग स्पर्धेत यश कुंडईकरचे यश

Patil_p

गुळेली आयआयटी प्रकल्पाबाबत जनमत जाणून घेणार

Omkar B

संचार बंदी ला सत्तरी तालुक्मयात शंभर टक्के प्रतिसाद

Omkar B

किर्लोस्कर मोटरची टोयोटा अर्बन प्रुजर सादर

Patil_p

गोव्यातील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडणार

Omkar B
error: Content is protected !!