तरुण भारत

सौ.विजयाताईवर आज अंत्यसंस्कार

प्रतिनिधी/ फोंडा

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांच्या पत्नी सौ. विजयाताई नाईक यांच्या पार्थिवावर आज गुरुवार 14 रोजी दुपारी आडपई येथील मूळ गावात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्ययात्रेला केंद्रातील, कर्नाटक, महाराष्ट्राती व राज्यातील महनीय व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने शाही इतमामात अंत्यत चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisements

 विजयाताईंच्या मागे श्रीपादभाऊ, तीन पुत्र सिद्धेश, साईश व योगेश, स्नुषा अनुक्रमे  स्वनुपा, प्रतीक्षा व अदिती आणि नातवंडे अयंश, आयूष व पार्थवी असा मोठा परिवार आहे.

  सोमवारी रात्री कर्नाटक राज्यातील अंकोल्याजवळील होसकुंबी येथे कारगाडीला झालेल्या भीषण अपघातात विजयाताई नाईक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. श्रीपादभाऊ हेही गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरु आहेत. विजयाताईंचे पार्थिव शरीर आज गुरुवारी सकाळी 8 वा. सुमारास जुने गोवे येथील ‘विजयश्री’ या निवासस्थानी आणले जाईल. तेथे काहीवेळ वाहनातच अंत्यदर्शनासाठी थांबल्यानंतर फोंडय़ातील आडपई गावातील ‘रामनाथ निवास’ या मूळ घरी अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता अंत्ययात्रा सुरु होईल.

 अंत्यसंस्कारांसाठी आडपईत चोख व्यवस्था

 अंत्यदर्शनाला राजकीय नेते, भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी व अन्य महनीय व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने आडपई गावात वाहतूक व्यवस्था व अन्य सुरक्षेसंबंधी कडेकोट उपययोजना करण्यात आल्या आहेत. आडपई गावाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दुचाकी, चारचाक्या तसेच महनीय व्यक्तींच्या वाहनांसाठी वेगवेळय़ा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

 महनीय व्यक्तींसाठी दुर्भाट-आडपई पंचायत कार्यालयाजवळ पार्किंगची सोय केलेली आहे. इतर लोकांना कार पार्किंगसाठी दत्तमंडपाजवळील मैदानावर आणि दुसऱया बाजूने आडपई फेरीमार्गावर पार्किंगची सोय केलेली आहे. दुचाकी पार्किंगसाठी तारीवाडा येथील सरदेसाईंच्या घरासमोरील जागा खुली ठेवण्यात आली आहे.

 आडपई गावात मोठय़ाप्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. फोंडय़ापर्यंत विविध नाक्यावर वाहतूक पोलीस बंदोबस्त सज्ज असेल. वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस, अधीक्षक शोभीत सक्सेना व इतर अधिकाऱयांनी सुरक्षा व वाहतूकीसंबंधी आढावा घेतला.

 महनीय व्यक्ती येणार असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था

  अंत्यसंस्कार घरापासून जवळच असलेल्या कौटुंबिक स्मशानभूमित होणार आहेत.  अंत्ययात्रेच्यावेळी स्मशानभूमित काही महनीय व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने तेथील पायवाटेवर कच्चा रस्ता तयार केलेला आहे. मॅटल डिटेक्टरसह अन्य सुरक्षेची यंत्रणाही सज्ज केली असून मांडव उभारुन बसण्यासाठी आसनव्यवस्था केलेली आहे. स्मशानभूमी व निवासस्थानासह काही अंतराच्या परिघात सुरक्षेची कडेकोट व्यवस्था ठेवण्यात येईल.

आडपई-रासई फेरीबोट बंद, दुर्भाट-रासईवर अतिरिक्त फेरीबोटी

 आडपई-रासई मार्गावरील फेरीबोट सेवा बंद राहणार असून दुर्भाट-रासई मार्गावर अतिरिक्त फेरीसेवा असेल. कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व्हावे यासाठी खबरदारीच्या उपययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

गोमंतकीय प्रवाशांकडून पैसे घेऊ नये

Omkar B

प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची गोव्याची क्षमता

Patil_p

देशी पर्यटकांनी गोवा फुल्ल

Patil_p

वाळपईतील हिंदुस्थान ऍरोनॉटिकलच्या उद्योगाचे काम सुरू होणार

Patil_p

गोपाळकृष्ण भोबे यांचे चरित्र व साहित्य ग्रंथरूपात

Amit Kulkarni

फिरणाऱया कोरोना संशयितांना शोधण्यासाठी ‘कोविड लोकेटर’ ऍप

Patil_p
error: Content is protected !!