तरुण भारत

पत्रकार गोविंद खानोलकर यांचे अपघाती निधन

वाळपई/ प्रतिनिधी

 दै. तरुण भारतसाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा करणारे पत्रकार गोविंद खानोलकर यांचे काल बुधवारी संध्याकाळी अपघाती निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. आज गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव निवासस्थानी आणण्यात येऊन नंतर अंत्ययात्रा निघेल, अशी माहिती देण्यात आली.

 गोविंद खानोलकर हे आपल्या दुचाकीवरून होंडा येत असतना त्यांच्या मागून येणाऱया दुसऱया दुचाकीने त्यांच्या गाडीला ठोकर दिल्यामुळे ते रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्मयाला जबर मार बसला. प्रथम साखळी येथील इस्पितळामध्ये प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना बांबोळी येथे गोमेकॉत पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. यामुळे या भागामध्ये हळहळ निर्माण झाली.

 गोविंद खानोलकर यांनी गेली तीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये वार्ताहर म्हणून योगदान दिले आहे. तरुण भारतसाठी ते होंडा वार्ताहर म्हणून कार्यरत होते. सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे संबंध होते. पिसुर्ले अर्बन को-ऑपरेटिव्ह पेडिट सोसायटीचे संचालक होते. होंडा येथील आजोबा देवस्थानाचे ते सभासद होते. ते कदंब महामंडळाचे माजी कर्मचारी होते.

 त्यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा मृतदेह होंडा आजोबानगर  त्यांच्या निवासस्थानी आज गुरुवारी सकाळी 11 वाजता दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 सत्तरी पत्रकार संघाचे मोठे नुकसान ः सावंत

 खानोलकर यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे. सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये गोविंद खानोलकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. गोविंद यांनी सत्तरी पत्रकार संघाच्या कार्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. सत्तरी तालुक्मयाच्या अनेक सामाजिक कार्यात सहभागी होताना अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून पत्रकार या नात्याने अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली असून त्यांचे कार्य येणाऱया काळातही जिवंत राहणार आहे, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 आजोबा देवस्थानच्या कार्यकारी समितीने त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे. पिसुर्ले अर्बन पेडिट सोसायटीचे चेअरमन पुंडलिक परब व इतर संचालकांनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Stories

युवा काँग्रेसतर्फे बिल्डकाँम कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

Patil_p

कोळशाचे कण गोव्याच्या समुद्रकिनाऱयावर

Omkar B

गोव्यात 2022 मध्ये काँग्रेसचे राज्य यावे ही गोमंतकीयांची इच्छा

Patil_p

पेडणे तालुक्यातील चारही मतदारसंघात 70 टक्केपेक्षा कमी मतदान

Patil_p

2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजप अन्य पक्षांशी युती करणार नाही

Patil_p

पेडण्यातील किनारपट्टी भागात पहाटेपर्यंत पाटर्य़ा

Patil_p
error: Content is protected !!