तरुण भारत

‘कोव्हिशिल्ड’ डोस गोव्यात दाखल

सरकारी, खासगी आरोग्य कर्मचाऱयांना देणार

प्रतिनिधी/ पणजी

कोरोना लसीकरणासाठी 23,500 ‘काव्हिशिल्ड’ हे डोस गोव्यात पोहोचले असून शनिवार दि. 16 जानेवारीपासून सरकारी व खासगी हॉस्पिटलातील आरोग्य कर्मचाऱयांना ते देण्यात येणार आहेत.

‘कोव्हिशिल्ड’ नामक लसीचे दोन बॉक्स काल बुधवारी सकाळी दाबोळी विमानतळावर पोहोचले. आरोग्य खात्यातर्फे ते ताब्यात घेऊन योग्य त्या ठिकाणी साठवणूक करुन ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे पुणे येथून ते डोस आल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील गोव्यात आलेले हे डोस आरोग्य कर्मचाऱयांना देण्याची योजना असून सरकारने निश्चित केलेल्या एकूण 8 इस्पितळातून त्या डोसचे वितरण करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रातूनही प्रत्येकी 100 डोस दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सरकारी व खासगी इस्पितळातील सुमारे 19,000 आरोग्य कर्मचाऱयांना गोव्यात आलेले हे डोस प्रथम देण्यात येतील. त्यानंतर दुसऱया टप्प्यातील डोस हे आजारी माणसांना दिले जातील आणि मग तिसऱया टप्प्यातील डोस सर्वसामन्य जनतेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Stories

वाघांची नखे गायब प्रकरणाची चौकशी

Patil_p

गोव्यातील जमिनी परप्रांतिय खरेदीवर करण्यास बंदी आणणार कायदा असणे गरजेचे

Patil_p

पार्सेत वाघाची दहशत : वाघाच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार : तर एक जखमी

Omkar B

सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका..!

Patil_p

शासकीय बंगल्याच्या बीलांवर मंत्र्यांची नावे

Patil_p

दिशाभूल करण्याकरिता काँग्रेसने नाहक आरोप करू नयेत

Patil_p
error: Content is protected !!