तरुण भारत

कसाईखाना-शेडच्या लिलावाला दुसऱयांदाही बोली नाहीच

भाडे जास्त असल्याने व्यावसायिकांनी फिरविली पाठ

प्रतिनिधी/ बेळगाव

महसूल वाढीसाठी महानगरपालिकेने व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव मोहीम सुरू केली आहे. कोनवाळ गल्ली येथील मटण मार्केट आणि बकरी ठेवण्याचे शेड तसेच कसाई गल्ली येथील कसाईखाना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. मागीलवेळी कोणीच बोली लावली नसल्याने दुसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. मात्र, कत्तलखाना आणि बकरी ठेवण्याच्या शेडचे भाडे जास्त असल्याचे सांगून लिलाव प्रक्रियेकडे व्यावसायिकांनी दुसऱयांदाही पाठ फिरविली. त्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द झाली.

महापालिकेने कसाई गल्ली येथे बकरी ठेवण्याचे शेड व कत्तलखान्याची उभारणी केली होती. सदर इमारतीचा वापर मागील काही वर्षांपासून मटण मार्केटमधील व्यावसायिक करीत होते. पण या मोबदल्यात महापालिकेला कोणतेच भाडे मिळत नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी बकरी ठेवण्याचे शेड व कत्तलखाना भाडेतत्त्वावर देण्याकरिता लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र, भाडे जास्त असल्याचे सांगून लिलाव प्रकियेत सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे लिलाव प्रक्रिया बारगळली होती. मात्र, बुधवारी दुसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. कत्तलखान्यासाठी प्रति महिना 35 हजार रुपये भाडे आणि 5 लाख रुपये अनामत रक्कम तसेच बकरी ठेवण्याच्या शेडकरिता प्रतिमहिना 25 हजार रुपये भाडे आणि 5 लाख 50 हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेने निश्चित केली आहे.

मागील वेळीप्रमाणेच भाडे ठेवण्यात आल्याने अनामत रक्कम व भाडे जास्त असल्याने कोणीच व्यावसायिक भरण्यास तयार नाहीत. परिणामी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या लिलावप्रसंगी कोणीच भाग घेतला नाही. दुसऱयांदाही व्यावसायिकांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याने ही प्रक्रिया बारगळली.

Related Stories

छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

Patil_p

पोवडय़ातून जागविला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास

Patil_p

शाहूनगर येथील साई मंदिरात कार्तिकोत्सव

Patil_p

फेरीवाल्यांना कर्ज देण्यासाठी बँकांकडून विविध अटी

Patil_p

गुलमोहराचे झाड चालत्या गाडीवर कोसळले

Patil_p

कोरोना लॅब याचिकेची व्याप्ती आता राज्यभर

Patil_p
error: Content is protected !!