तरुण भारत

केदनूर येथे गांजा विकणाऱया तिघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

केदनूर (ता. बेळगाव) येथे सीआयडी विभागाच्या अधिकाऱयांनी गांजा बाळगल्याच्या व विकल्याच्या आरोपावरुन तिघा जणांना अटक केली आहे. या टोळीतील आणखी काही जण फरारी झाले आहेत.

Advertisements

सीआयडी विभागाने ताब्यात घेतलेल्या तिघा जणांपैकी एका तरुणाला वाचविण्यासाठी राजकीय दबाव सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून गावातील काही तरुण स्वतः गांजाचा वापर करण्याबरोबरच गांजा विकण्याच्या कामातही गुंतले आहेत.

बसस्थानक व मंदिरांजवळ सर्रास गांजाची विक्री केली जाते. व्यसनाधिनतेमुळे काही जणांनी यापूर्वी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सीआयडी विभागाने नेमके कोणाला ताब्यात घेतले, याचा तपशील उपलब्ध झाला नाही. यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वी केदनूरला भेट दिली. त्यावेळी तेथील महिलांनी नशेबाजांबद्दल तक्रार केली होती. आमदारांनी स्थानिक पोलिसांना कारवाई करण्याची सूचना दिली होती.

Related Stories

ज्ञानमंदिरांतूनच मुलांचे भविष्य उज्ज्वल करावे

Amit Kulkarni

विश्व हिंदू परिषद-बजरंग दलतर्फे विजयोत्सव

Omkar B

आरएसएसकडून देशप्रेम वाढविण्याचे काम

Patil_p

उचगाव परिसरातून बंदला प्रतिसाद

Amit Kulkarni

आविष्कार महिला उद्यमशील संस्थेचा आज वर्धापन दिन

Amit Kulkarni

खानापूर-पारवाड वस्ती बस सुरू करा

Omkar B
error: Content is protected !!